शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अब्दुल सत्तार,अमित देशमुख मंत्रीमंडळात

By admin | Updated: June 2, 2014 22:42 IST

काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांनी सोमवारी कॅबिनेट मंत्री म्हणून तर अमित देशमुख यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

मराठवाड्याचा टक्का वाढलामुंबई : काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांनी सोमवारी कॅबिनेट मंत्री म्हणून तर अमित देशमुख यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनात एका छोटेखानी समारंभात राज्यपाल के.शंकरनारायणन यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी उपस्थित होते. अब्दुल सत्तार आणि अमित देशमुख हे दोघेही मराठवाड्यातील आहेत. सत्तार यांनी यापूर्वी अशोक चव्हाण सरकारमध्ये राज्यमंत्रीपद भूषविले असून ते औरंगाबाद जिल्‘ातील सिल्लोडचे आमदार आहेत. ते अशोक चव्हाण यांचे क˜र समर्थक मानले जातात. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र असलेले अमित पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. ते लातूरचे आमदार आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारीच होणार होता पण काँग्रेस श्रेष्ठींनी अंतिम मंजुरी न दिल्याने तो होऊ शकला नाही. देशमुख, सत्तार यांच्या बरोबरच पुण्याचे रमेश बागवे, चिमूरचे विजय वडे˜ीवार, मुंबईतील बाबा सिद्दीकी यांचीही नावे चर्चेत होती. दोन मंत्र्यांचा समावेश करून काँग्रेसने आपल्या कोट्यातील तीनपैकी दोन रिक्तपदे भरली आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, अलिकडे शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आज शपथ घेतलेल्या काँग्रेसच्या दोन्ही मंत्र्यांचा परिचय विधानसभेत करुन दिला. आमच्या समावेशाने मराठवाड्याला मंत्रिमंडळात आणखी स्थान मिळाल्याचा विशेष आनंद आहे. आमच्या मंत्रिपदाचा उपयोग लोकांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच काँग्रेस पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी करू, अशी भावना दोन्ही मंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. (विशेष प्रतिनिधी)