शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 06:40 IST

Maharashtra local body elections: शिवसेना उबाठा आमदार आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: विरोधी पक्षांचे उमेदवार पडून सत्ताधारी पक्षांचे उमेदवार जिंकतील, अशा प्रारूप याद्या बनविण्यात आल्या. हा घोळ पाहता ही निवडणूक ‘गेम सेट मॅच’ केली आहे, असा आरोप आ. आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी केला. अशा निवडणुका घेण्याची गरज नसून ‘इलेक्शन’ऐवजी थेट ‘सिलेक्शन’च करा, अशी टीका  केली. 

निवडणुकांसाठी २ जुलै २०१५ ची मतदारयादी निवडणूक आयोगाने ग्राह्य धरली आहे. त्यामुळे या काळात १८ वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदानाचा अधिकार मिळणार नाही. ७ नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणाऱ्या प्रारूप यादीची तारीख पुढे ढकलून ती २० नोव्हेंबर केली. जाहीर केलेली यादी ‘मशीन रीडेबल’ नसल्याने  गोंधळ झाला आहे, असे ते म्हणाले.

आठवड्यात यादीतील गोंधळ जनतेसमोर आणणार

सत्ताधाऱ्यांच्या कार्यालयात बसून निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांचे उमेदवार पडतील अशा प्रकारे प्रारूप याद्या बनविल्या आहेत. सत्ताधाऱ्यांनी एका बूथमधील अनेक मतदार दुसऱ्या बूथमध्ये हलवले आहेत. त्यामुळेच या याद्या येण्यासाठी वेळ लागला. वॉर्ड बनवणे, वॉर्डाच्या सीमारेषा आखणे जमले नाही. यादीच्या यादी उचलून दुसऱ्या यादीत टाकली आहे. या अत्यंत किचकट यादीत तुमची इमारत, तुमचे नाव यादीत आहे की नाही ते कळत नाही. या सर्व गोष्टींचा अभ्यास सुरू असून, येत्या आठवड्यात यादीतील गोंधळ जनतेसमोर आणू. काम न जमणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसवणे गरजेचे आहे. हे जाणूनबुजून केले असल्यास जनतेचा मतदानाचा हक्क हिसकावला म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Aditya Thackeray Slams Voter List Chaos: 'Selection' Over 'Election'!

Web Summary : Aditya Thackeray accuses the Election Commission of creating biased voter lists favoring ruling parties. He alleges deliberate manipulation, demanding action against responsible officials and threatening to expose irregularities within a week, even calling for treason charges.
टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPoliticsराजकारण