शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 06:46 IST

सप्टेंबरमधील अतिवृष्टीची नुकसानभरपाई सरकारकडून जाहीर...

मुंबई : सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील २१ लाख ६६ हजार १९८ शेतकऱ्यांच्या १५ लाख १६ हजार ६८१ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी १३५६ कोटी ३० लाख २२ हजार रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

तसेच, जुलै व ऑगस्ट २०२५ या महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या १९ लाख २२ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या १५ लाख ४५ हजार २५०.०५ हेक्टरवरील शेतपिकाच्या नुकसानीपोटी १ हजार ३३९ कोटी ४९ लाख २५ हजारांच्या मदतीसही मान्यता देण्यात आली आहे.

नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहे. त्यामुळे शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्याची आवश्यकता राहणार नाही त्यांना मदत त्वरित व कार्यक्षम पद्धतीने वितरित होईल. मकरंद जाधव-पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री

सप्टेंबरमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अशी मिळेल मदत जिल्हा    शेतकरी     बाधित क्षेत्र (हेक्टर)    मदत (रुपये)सातारा    ११,११३     ४.२१९.२८         ६.२९ कोटीकोल्हापूर     ५,८६०     १,६९६.३६     ३.१८ कोटी बीड     ८,०६,५१३     ६,४४,९१८.५५     ५७७.७८ कोटी धाराशिव     ४,०४,६५६     ३,११,२९१.२३     २९२.४९ कोटी लातूर     ४,१५,४९२     २३,०६,६२८.९९     २०२.३८ कोटी परभणी     ४,३९,२९७     २,८५,८५३.७८     २४५.६४ कोटी नांदेड     ८३,२६७     ३२,०७३.०२     २८.५२  कोटी 

जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाईअमरावती विभाग : अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांतील ७,८८,९७४ शेतकऱ्यांच्या ६,५४,५९५.४२ हेक्टरवरील नुकसानीपोटी ५६५ कोटी ६० लाख ३० हजारांच्या मदतीस मान्यता.

नागपूर विभाग : गोंदिया, भंडारा, वर्धा गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांतील  ३७,६३१ शेतकऱ्यांच्या २१,२२४.६४ हेक्टरवरील नुकसानीपोटी २३ कोटी ८५ लाख २६ हजारांच्या मदतीस मान्यता.

पुणे विभाग : कोल्हापूर जिल्ह्यातील ३६ हजार ५५९ शेतकऱ्यांच्या ८ हजार ८३५.१५ हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी १४ कोटी २८ लाख ५२ हजारांच्या मदतीस मान्यता.

छ. संभाजीनगर विभाग : हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांतील १० लाख ३५ हजार ६८ शेतकऱ्यांच्या  ८ लाख ४८ हजार ४४५.३७  हेक्टरवरील नुकसानीपोटी ७२१ कोटी ९७ लाख ८६ हजारांच्या मदतीस मान्यता.

नाशिक विभाग : नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहिल्यानगर जिल्ह्यांतील २४ हजार ६७७ शेतकऱ्यांच्या १२ हजार १४९.४६  हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी १३ कोटी ७७ लाख ३१ हजारांच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Hope for Farmers: ₹1356 Crore Aid for 21 Lakh Farmers

Web Summary : Maharashtra approves ₹2695.79 crore aid for farmers affected by heavy rains and floods in September and July-August 2025. Over 40 lakh farmers across multiple districts will benefit from this financial relief, distributed directly at the district level.
टॅग्स :FarmerशेतकरीEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस