छोट्या चिमुकल्यांसाठी स्पेशल सिमकार्ड? हे ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. परंतु इजिप्तमध्ये हे प्रत्यक्षात येणार आहे. इजिप्तमध्ये एक स्पेशल चाइल्ड सिम कार्ड लॉन्च होणार आहे. ३० जून २०२६ पासून ते सेवेत येईल. त्यात सुरक्षित इंटरनेट पॅकेज, आई वडिलांचे कंट्रोल आणि वयानुसार सोशल मीडियाच्या वापरावरील निर्बंध यांचा समावेश असेल. लहान मुलांना सोशल मीडियाच्या वापरामुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी ही संकल्पना पुढे आली आहे.
स्पेशल सिम कार्डमध्ये काय असेल खास?
लहान मुलांना इंटरनेटच्या विळख्यातून वाचवण्यासाठी सरकारने ही नवी योजना हाती घेतली आहे. नवीन सिम कार्ड लॉन्च करणे हादेखील या योजनेचा भाग आहे. त्यात फिक्स्ड इंटरनेट कंट्रोल व्यवस्थेचा समावेश आहे. त्याला टेलिकॉम ओपरेटरसोबत मिळून बनवण्यात आले आहे. एकाच वेळी अनेक नेटवर्क्स ओळखण्यास आणि त्यावर कार्य करण्यास सक्षम असलेल्या टर्मिनल उपकरणांद्वारे कन्टेंटचे विभाजन आणि आई वडिलांसाठी कंट्रोल सुविधा उपलब्ध करणे हा याचा उद्देश आहे.
मुलांसाठी बनवला जातोय सुरक्षा ड्राफ्ट
पंतप्रधान मुस्तफा मदबौली यांनी इंटरनेटपासून लहान मुलांच्या सुरक्षेशी निगडित विधेयक वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या मंत्रिमंडळ सल्लागार मंडळाकडून मसुदा तयार केला जात आहे. जेणेकरून तो संबंधित अधिकाऱ्यांसोबत सामायिक करून एक सर्वसमावेशक विधेयक तयार करता येईल. राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांच्या निर्देशांनुसार सरकार डिजिटल युगातील धोक्यांचा सामना करण्यासाठी सुरक्षित ऑनलाइन जागा सुनिश्चित करण्यासाठी आणि सामाजिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी तातडीने एक कायदा तयार करत आहे असं मदबौली यांनी पुष्टी केली.
भारतासाठीही असा कायदा महत्त्वाचा का?
भारतात लहान मुले स्मार्ट फोन आणि इंटरनेट मोठ्या प्रमाणात वापरतात. बदलणाऱ्या जगात ऑनलाइनच्या माध्यमातून होणारे गुन्हेही वाढत आहेत. लहान मुलांवर इंटरनेटचा थेट परिणाम होत आहे. इंटरनेटवर हिंसाचार, पोर्नोग्राफी आणि अमली पदार्थांना प्रोत्साहन देणारे कन्टेंट सहज उपलब्ध होतात. विना पालक कंट्रोल किंवा सुरक्षा कायद्यांअभावी लहान मुले नकळतपणे अशा कंन्टेंटच्या संपर्कात येतात. म्हणूनच त्यांच्या ऑनलाइन सुरक्षेसाठी भारतात आणि इतर देशांमध्ये लहान मुलांसाठी सिम कार्ड अनिवार्य करणं गरजेचे आहे.
Web Summary : Egypt is launching 'Child SIM' with safe internet and parental controls by 2026 to protect kids from harmful content. With rising online threats, experts say India needs similar child safety laws for young internet users.
Web Summary : मिस्र बच्चों को हानिकारक सामग्री से बचाने के लिए 2026 तक सुरक्षित इंटरनेट और माता-पिता के नियंत्रण के साथ 'चाइल्ड सिम' लॉन्च कर रहा है। बढ़ते ऑनलाइन खतरों को देखते हुए, विशेषज्ञों का कहना है कि भारत को भी युवा इंटरनेट उपयोगकर्ताओं के लिए ऐसे बाल सुरक्षा कानूनों की आवश्यकता है।