शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरू निवडीसाठी ९१ लाखांच्या जाहिराती

By admin | Updated: February 4, 2015 01:04 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इच्छुकांकडून अर्ज मागविण्यासाठी जाहिरात काढण्यात आली. प्रादेशिक व राष्ट्रीय प्रसार

एकूण खर्च कोटीच्यावर जाणार : पाच वर्षांचे वेतन ९० लाख नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इच्छुकांकडून अर्ज मागविण्यासाठी जाहिरात काढण्यात आली. प्रादेशिक व राष्ट्रीय प्रसार माध्यमांमध्ये करण्यात आलेल्या जाहिरातींचा खर्च सुमारे ९१ लाख रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील वेळी संपूर्ण प्रक्रियेचा खर्च ५ लाखांच्या जवळपास होता. यंदा इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची गरज का पडली, यासंदर्भात विद्यापीठ वर्तुळात प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पाच वर्षांचा कुलगुरूच्या वेतनाचा खर्च ९० लाख रुपये अपेक्षित आहे. मात्र त्यांना मिळणाऱ्या वेतनाच्या तुलनेत जाहिरातींचा खर्च अधिक झाल्याने नवे कुलगुरू खऱ्या अर्थाने लाखमोलाचे ठरणार आहेत!डॉ. विलास सपकाळ यांनी मागील वर्षी मार्च महिन्यात राजीनामा दिल्यापासून विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरूंची प्रतीक्षा आहे. २५० महाविद्यालयांच्या प्रवेशबंदीच्या मुद्यावरून डॉ. विलास सपकाळ यांनी राजीनामा दिला. त्यानंतर विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे प्रभारी कार्यभार देण्यात आला होता. शंभरावा दीक्षांत समारंभ झाल्यानंतर ही जबाबदारी डॉ. विनायक देशपांडे यांना देण्यात आली. त्यानंतर कुलगुरूपदाची निवड प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार, याकडे विद्यापीठाचे लक्ष लागले होते. १२ जानेवारी कुलगुरूपदाच्या रिक्त जागेसाठी शोध समितीकडून जाहिरात जारी करण्यात आली. ६ फेब्रुवारीपर्यंत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले. काय करीत होते अधिकारी?नागपूर विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांना जाहिरातींवर इतका मोठा खर्च होत आहे याची सुरुवातीला माहितीच नव्हती. परंतु ज्यावेळी इतक्या प्रमाणात जाहिराती छापून आल्या आहेत हे लक्षात आले तोपर्यंत उशीर झाला होता. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राजभवनात या मुद्याची माहिती दिली. विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या मुलाखतीसाठी अर्ज करण्याची संधी देशभरातील विद्यापीठातील पात्र उमेदवारांना मिळणे अपेक्षित असते. परंतु त्यासाठी रोजगाराची माहिती देणारी राष्ट्रीय प्रकाशने उपलब्ध आहे. असे असताना प्रादेशिक स्तरावर जाहिराती देण्यामागचे कारण काय, असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)विद्यापीठाचे ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’९१ लाख रुपयांच्या जाहिरातींसंदर्भात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे यांना विचारणा केली असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अद्याप याची देयके विद्यापीठाला मिळालेली नाहीत. त्यामुळे नेमका खर्च किती आला याबाबत आताच सांगता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. रक्कम बरीच मोठी असल्यामुळे देयके आल्यानंतर मंजुरीसाठी व्यवस्थापन परिषदेसमोर मांडावे लागतील, असे प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ. पूरण मेश्राम यांनी स्पष्ट केले.शोध समितीच्या बैठकीनंतर कुलगुरूपदासाठी जाहिरात देण्याचा निर्णय घेण्यात आला. विविध प्रसार माध्यमांतून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. महाराष्ट्र राज्यासोबतच राष्ट्रीय स्तरावर जाहिरात देण्यात आली. चकित करणारी बाब म्हणजे अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक माध्यमांमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली. साहजिकच यामुळे जाहिरातींचा खर्च वाढला. निवड प्रक्रियेवरच मागील वेळेच्या तुलनेत सुमारे १८ पटींनी खर्च वाढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा संपूर्ण खर्च नागपूर विद्यापीठाला उचलावा लागणार आहे.