शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात तीन अपघातांत ९ ठार

By admin | Updated: August 1, 2014 04:18 IST

एक्स्प्रेस वे वरुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनावरील ताबा सुटून झालेल्या भीषण अपघातात चालकासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला

मुंबई : एक्स्प्रेस वे वरुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनावरील ताबा सुटून झालेल्या भीषण अपघातात चालकासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.ही धडक इतकी जोरदार होती की वाहनाचे अक्षरश: दोन तुकडे झाले होते. दुसऱ्या घटनेत वर्धा जिल्ह्णातील हिंगणघाटमध्ये रिक्षा उलटून दोन शेतमजूर महिलांचा, तर तिसऱ्या अपघातात राजापूर गंगेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला वेरळ घाटात कंटेनरने दिलेल्या धडकेत मायलेकांचा जागीच मृत्यू झाला़ या घटना गुरुवारी घडल्या़ वर्धा जिल्ह्णातील हिंगणघाटमध्ये महिलांना मजुरीसाठी शेतात घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालकाचे मागून ट्रक येत असल्याचे लक्षात येताच नियंत्रण सुटले आणि रिक्षा उलटला. या अपघातात दोन ठार तर ११ महिला जखमी झाल्या. सुनंदा संतोष म्हैसकर (४९), विमल पिंपळशेंडे (६५) अशी मृतांची नावे आहेत़ दरम्यान, सहा महिलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सेवाग्राम रुग्णालयात हलविण्याच्या तयारीत असताना संतप्त जमावाने दोन रुग्णवाहिकांवर दगडफेक करुन काचा फोडल्या. यानंतर सर्वच जखमींना सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले. तर रत्नागिरीत जिल्ह्णातील राजापूर गंगेच्या दर्शनासाठी गुहागर पालशेतहून निघालेल्या भाविकांच्या वाहनाला कंटेनरने दिलेल्या धडकेत माय-लेकांचा जागीच मृत्यू झाला़ आशा प्रमोद अडूरकर, दुर्वास अडूरकर अशी मृत मायलेकांची नावे आहेत़ तसेच पाचजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ रत्नागिरीत हलविण्यात आले आहे़ हा अपघात वेरळ घाटामध्ये गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास घडला. अपघातानंतर कंटेनर चालक किसनसिंग लालसिंग (४०) हा पळून गेला होता. त्याला वेरळ ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. कंटेनर काढण्यासाठी आलेल्या क्रेनमुळे महामार्गावरील वाहतूक अर्धा तास बंद करण्यात आली होती.