शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बलुतेदार संस्थांना ९८ कोटींची कर्जमाफी

By admin | Updated: February 14, 2016 00:25 IST

खादी व ग्रामोद्योग मंडळांतर्गत कार्यरत बलुतेदार तथा ग्रामोद्योग सहकारी संस्थांना ९८ कोटी ५९ लाख ८० हजार एवढ्या कर्जाची शासनाने माफी दिली आहे.

यवतमाळ : खादी व ग्रामोद्योग मंडळांतर्गत कार्यरत बलुतेदार तथा ग्रामोद्योग सहकारी संस्थांना ९८ कोटी ५९ लाख ८० हजार एवढ्या कर्जाची शासनाने माफी दिली आहे.खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राज्यात सर्वच जिल्ह्यात तालुकास्तरावर बलुतेदार संस्था कार्यरत आहेत. कारागीर हमी योजनेंतर्गत त्यांना व्यवसायासाठी कर्ज देण्यात आले होते. मात्र व्यवसाय डबघाईस आल्याने त्यांचे हे कर्ज प्रलंबित राहिले. ३११ बलुतेदार संस्थांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत झालेल्या कर्ज व व्याजाला माफी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. अखेर ३१ मार्च २००८ अखेरपर्यंतच्या कर्ज व व्याज अशा ९८ कोटी ५९ लाखांच्या रकमेला माफी देण्यात आली. त्यामध्ये ५१ कोटी ७४ लाख मुद्दल व ४६ कोटी ८४ लाखाच्या व्याजाचा समावेश आहे. राज्यातील बलुतेदार संस्थांच्या ८३ हजार ९८१ सभासदांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शासनाने ८ फेब्रुवारी २०१६ रोजी या संबंधीचे आदेश जारी केले आहे. संपूर्ण कर्जमाफीची मागणीकर्जाचे संपूर्ण व्याज माफ न झाल्याने बलुतेदार सभासदांचा सातबारा अद्याप कोरा झालेला नाही. २००८नंतर बहुतांश कर्जवाटप झाले नसले तरी त्यावरील व्याज मात्र आजही सुरू आहे. २००८नंतरचे व्याजही शासनाने माफ करून सातबारा कोरा करावा, अशी बलुतेदार तथा ग्रामीण कारागीर संस्थांची मागणी आहे. (प्रतिनिधी)