शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

तस्करीसाठी आणलेल्या ८३ बालकांची सुटका

By admin | Updated: December 16, 2014 03:45 IST

चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून बिहार येथून आणलेल्या ८३ बालकामगारांची आज लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सुटका करण्यात आली.

मुंबई : चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून बिहार येथून आणलेल्या ८३ बालकामगारांची आज लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सुटका करण्यात आली. यामध्ये ६ ते १६ वयोगटातील मुलांचा समावेश असून, कुर्ला रेल्वे पोलिसांनी या प्रकरणात ३३ जणांना ताब्यात घेतले आहे.गेल्या काही वर्षांपासून इतर राज्यांतील अल्पवयीन मुलांच्या तस्करीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेक पालक काही रुपयांसाठी आपल्या मुलांना एजंट लोकांच्या हाती देऊन मुंबईसारख्या शहरात पाठवतात. अशाच प्रकारे बिहारमधील मोतीहारी जिल्ह्यातून काही अल्पवयीन मुलांना कामासाठी मुंबईत पाठवण्यात येणार असल्याची माहिती ‘प्रथम’ या सामाजिक संस्थेला मिळाली होती. या संस्थेचे काही कार्यकर्ते अनेक दिवसांपासून यावर लक्ष ठेवून होते. त्यानुसार शनिवारी १५० अल्पवयीन मुलांना मुंबईकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती बिहारमधील कार्यकर्त्यांनी मुंबईतील कार्यकर्त्यांना दिली.सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही सर्व मुले जनसाधारण एक्स्प्रेसने मुंबईत दाखल होणार होती. त्यामुळे ‘प्रथम’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ही बाब कुर्ला रेल्वे पोलिसांना सांगितली. पोलिसांनीदेखील याबाबत तत्काळ दखल घेऊन आज पहाटे ५ वाजल्यापासूनच लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सापळा रचला होता. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ही गाडी सकाळी ६ऐवजी ११ वाजता आली. पोलिसांनी त्यांची तत्काळ चौकशी केली असता, त्यांच्यासोबत त्यांचा कोणीही जवळचा नातेवाईक नसल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी या सर्व मुलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. यातील काही मुले ही १७ वर्षांपेक्षा अधिक वयाची होती, त्यामुळे पोलिसांनी काही मुलांना सोडून दिले. मात्र यातील ८३ मुले ही १४ वर्षांखालील असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तसेच या वेळी पोलिसांनी या मुलांना घेऊन येणाऱ्या ३३ जणांनादेखील ताब्यात घेतले. या सर्व मुलांना धारावी, गोवंडी आणि मानखुर्दसारख्या परिसरात असलेल्या बेकऱ्या, हॉटेल्स आणि काही कारखान्यांमध्ये नोकरीला ठेवण्यात येणार असल्याची माहिती ‘प्रथम’ संस्थेच्या मॅनेजर शर्मिष्ठा खंडागळे यांनी दिली. तसेच यामध्ये एक मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता रेल्वे पोलिसांकडून वर्तवण्यात आली असून, याबाबत योग्य चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय थोपवळकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)