शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Anil Parab ED : अनिल परब यांची ८ तास चौकशी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 05:55 IST

बदल्या आणि वसुलीबाबत विचारणा.

ठळक मुद्देबदल्या आणि वसुलीबाबत विचारणा.

मुंबई :   गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर असलेल्या राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब  यांची मंगळवारी सुमारे ८  तास कसून चौकशी केली. सकाळी अकरा वाजता ईडीच्या  कार्यालयात पोहोचलेले परब सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बाहेर पडले. एनआयएच्या अटकेत असलेला बडतर्फ एपीआय सचिन वाझे याने १०० कोटींची वसुली आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या रॅकेटप्रकरणी दिलेल्या जबाबाच्या अनुषंगाने अधिकारी त्यांच्याकडे कसून चौकशी करीत असल्याचे समजते. कार्यालयाच्या परिसरात शिवसैनिकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन येथे  मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान,  ईडीने विचारलेल्या सर्व प्रश्नांना आपण सविस्तर उत्तरे दिली आहेत.  चौकशीसाठी आपण पूर्ण सहकार्य करत आहोत. ईडी सरकारी संस्था असल्याने आपण त्यांच्या प्रत्येक  प्रश्नांना उत्तरे देण्यास जबाबदार आहोत. मात्र व्यक्तिगत आरोपांना कोणतेही उत्तर देणार नाही, असे परब यांनी चौकशीनंतर माध्यमाशी बोलताना सांगितले. मात्र कोणत्या विषयावर चौकशी केली हे मात्र स्पष्ट केले नाही. 

‘काेणतीही चूक नाही’ईडीच्या कार्यालयात चौकशीला हजर होण्यापूर्वी अनिल परब यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘मी काहीही चूक केलेली नाही. पण ईडीने  मला कोणत्या कारणासाठी समन्स बजावले आहे, याची माहिती नाही. मी ईडीच्या कार्यालयात चौकशीला जात आहे. मला जे प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरे देणार. मी शिवसेनाप्रमुखांची व माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगितलं होतं, मी काेणतीही चूक केलेली नाही.

 

टॅग्स :Anil Parabअनिल परबMaharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयsachin Vazeसचिन वाझे