शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महाबीज संचालक पदांच्या निवडणुकीत ७६.३७ टक्के मतदान

By admin | Updated: August 17, 2014 00:15 IST

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज)संचालक पदांसाठी निवडणुक; २२ ऑगस्ट रोजी मतमोजणी.

अकोला: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) दोन संचालक पदांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीसाठी सरासरी ७६.३७ टक्के मतदान झाले आहे आहे. पोस्टाद्वारे प्राप्त झालेल्या मतपत्रिकांची शनिवार, १६ ऑगस्टपासून छाननी सुरू करण्यात आली असून, २२ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे.महाबीज संचालक मंडळावर तीन वर्षांकरिता कृषी भागधारकांमधून दोन संचालकांची निवड करण्यासाठी निवडणूक घेण्यात येत आहे. त्यामध्ये अकोला-विदर्भ मतदारसंघातून अकोल्याचे खा. संजय धोत्रे, प्रशांत गावंडे व अमरावती जिल्हय़ातील प्रताप भुयार तसेच उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून परभणीचे नंदकुमार भोसले, नांदेडचे राजेश्‍वर पावडे व बुलडाणा जिल्हय़ातील वल्लभराव देशमुख निवडणूक लढवित आहेत. या निवडणुकीच्या मतदानासाठी अकोला-विदर्भ मतदारसंघात ३ हजार ३७६ आणि उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघात ३ हजार ३६ अशा एकूण ६ हजार ४१२ मतपत्रिका महाबीजमार्फत पोस्टाद्वारे भागधारकांकडे पाठविण्यात आल्या होत्या. पोस्टाद्वारे भागधारकांकडे पाठविण्यात आलेल्या मतपत्रिका १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३0 वाजेपर्यंत मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार पाठविण्यात आलेल्या एकूण ६ हजार ४१२ मतपत्रिकांपैकी ४ हजार ८९७ मतपत्रिका पोस्टाद्वारे महाबीजकडे प्राप्त झाल्या. त्यामध्ये अकोला-विदर्भ मतदारसंघातून २ हजार ६३३ आणि उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून २ हजार २६४ मतपत्रिका प्राप्त झाल्या. त्यामुळे या निवडणुकीत सरासरी ७६.३७ टक्के मतदान झाले आहे. मतदानात प्राप्त झालेल्या मतपत्रिकांची छाननी शुक्रवार, १६ ऑगस्टपासून महाबीज भवन येथे सुरू करण्यात आली असून, २१ ऑगस्टपर्यंत मतपत्रिकांची छाननी प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार असून, निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.