शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पांचा डोंगर ७० हजार कोटींचा

By admin | Updated: November 18, 2014 02:33 IST

जे प्रकल्प ७५ टक्के व त्यापेक्षा जास्त पूर्ण झाले आहेत त्यांना आधी निधी द्या, प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवा अशी भूमिका भाजपा नेत्यांनी यापूर्वी घेतली होती.

अतुल कुलकर्णी, मुंबईराज्यात जलसंपदा विभागाचे ४५२ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७० हजार ७४९.८८ कोटी रुपये लागणार आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार प्राधान्यक्रम ठरवणार की, जे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने केले; तीच पद्धती पुढे चालू ठेवणार याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. अद्याप राज्याला स्वतंत्र जलसंपदा मंत्री मिळालेला नाही, त्यामुळे अधिकारीदेखील शांत बसून आहेत.जे प्रकल्प ७५ टक्के व त्यापेक्षा जास्त पूर्ण झाले आहेत त्यांना आधी निधी द्या, प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवा अशी भूमिका भाजपा नेत्यांनी यापूर्वी घेतली होती. तेच आता राज्यात सत्तास्थानी आहेत. आघाडी सरकारने जे प्रकल्प १० टक्के पूर्ण झाले आणि जे ८० टक्के पूर्ण झाले अशा सगळ्याच प्रकल्पांना थोडे-थोडे पैसे देण्याची नीती अवलंबली होती. त्यातून एकही प्रकल्प पूर्ण झाला नाही, प्रकल्पही पूर्ण झाले नाहीत आणि त्यांच्या किमतीदेखील सतत वाढत गेल्या. त्यामागे त्या-त्या मतदारसंघाचे स्थानिक राजकारणही केले गेले. राजकीय इच्छाशक्ती दाखवून जे प्रकल्प ७५ टक्के पूर्ण झाले आहेत त्यांना आधी निधी देऊ अशी भूमिका कधीही मावळत्या राज्यकर्त्यांनी घेतली नाही. त्यासाठी ते कायम राज्यपालांच्या निदेशांच्या आड लपत राहिले.आजही राज्यात ४५२ लहान, मध्यम व मोठे प्रकल्प निधीअभावी पडून आहेत. ज्यात ८० टक्के पूर्ण झालेलेही प्रकल्प आहेत आणि २५ टक्के काम झालेलेदेखील आहेत. आघाडी सरकारने जलसंपदा विभागाची श्वेतपत्रिका काढली त्यात ६७० प्रकल्पांसाठी ७८,४५०.७७ कोटी रुपये लागतील असे सांगितले होते. श्वेतपत्रिका ३० नोव्हेंबर २०१२ रोजी आली होती. तेव्हापासून भाजपा सरकार सत्तेवर येईपर्यंत ७७०१ कोटी रुपये खर्च करून २१८ छोटे प्रकल्प पूर्ण केल्याची आकडेवारी समोर आली आहे.