चेंबूरमध्ये ७ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

By Admin | Updated: December 4, 2014 02:55 IST2014-12-04T02:55:46+5:302014-12-04T02:55:46+5:30

घरात एकटीच असल्याची संधी साधत शेजारीच राहणाऱ्या आरोपीने ७ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चेंबूर येथे घडली आहे

7-year-old girl raped in Chembur | चेंबूरमध्ये ७ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

चेंबूरमध्ये ७ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

मुंबई : घरात एकटीच असल्याची संधी साधत शेजारीच राहणाऱ्या आरोपीने ७ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चेंबूर येथे घडली आहे. याबाबत चेंबूर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.
चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी परिसरात ही चिमुरडी आईवडिलांसोबत राहते. मंगळवारी दुपारी ती शेजारीच राहणाऱ्या मैत्रिणीकडे खेळण्यासाठी गेली होती. याच दरम्यान या मुलीच्या घरात हा २० वर्षीय आरोपी टीव्ही पाहात होता. काही वेळानंतर या चिमुरडीची मैत्रीण काही सामान घेण्यासाठी दुकानात गेली होती. त्यामुळे घरात हा आरोपी आणि पीडित मुलगीच होती. हीच संधी साधत या नराधमाने मुलीवर बलात्कार आणि अनैसर्गिक अत्याचार केला.
काही वेळानंतर मुलगी घरी परतली. ती अस्वस्थ दिसत असल्याने तिच्या आईने तिच्याकडे विचारणा केली असता, तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानुसार पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तत्काळ चेंबूर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर काल रात्रीच या आरोपीला चेंबूर पोलिसांनी अटक केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 7-year-old girl raped in Chembur