शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ५,७४२ कोटींची वीज बिले थकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 07:30 IST

पाच महिन्यांतील आकडेवारी; कोरोना काळात घरगुती वीज ग्राहकांकडे सर्वाधिक थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनामुळे कोसळलेल्या आर्थिक संकटाचा फटका महावितरणच्या बिल वसुलीवरही बसला. एप्रिल ते आॅगस्ट, २०२० या पाच महिन्यांत थकबाकी तब्बल ५ हजार ७४२ कोटींवर झेपावली. त्यात सर्वाधिक ३ हजार ५२१ कोटींची थकबाकी घरगुती वीज ग्राहकांकडे आहे. सरकारने केलेली आणि प्रत्यक्षात न आलेली वीज बिल माफीची घोषणा हेसुद्धा यामागचे प्रमुख कारण असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

एप्रिल ते आॅगस्ट, २०१९ या कालावधीत घरगुती वीज ग्राहकांना ८ हजार ९४९ कोटींची बिले पाठविण्यात आली होती. त्यापैकी ८,१०७ कोटींचा भरणा ग्राहकांनी केला. यंदा याच कालावधीत महावितरणने ९ हजार १० कोटींची बिले पाठवली असून ग्राहकांनी जेमतेम ५,४८९ कोटीच जमा केल्याची माहिती हाती आली आहे.

मार्च ते मे या महिन्यांतील सरासरी बिलांमुळे घरगुती वीज ग्राहकांना जून आणि जुलैमध्ये भरमसाट बिले आली होती. त्याविरोधात असंतोष निर्माण झाल्यानंतर सरकारने या वीज बिलांमध्ये सवलत देण्याची घोषणा केली. मात्र, सवलत दिल्यास राज्याच्या तिजोरीवर भार वाढेल, अशी सबब देत वित्त विभागाने प्रस्तावित बिल माफीला अद्याप हिरवा झेंडा दाखविलेला नाही.

वीज बिले माफ होतील या आशेपोटी अनेकांनी बिलांचा भरणा नाही. यापुढेही काहीतर होईल आणि बिले माफ होतील, या आशेवर अनेक ग्राहक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.कोरोना संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात औद्योगिक कारखाने बंद होते. अनलॉक प्रक्रियेदरम्यान निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यानंतर वीज मागणीत वाढ झाली. गेल्या पाच महिन्यांत राज्यातील औद्योगिक वीज ग्राहकांना १० हजार ३७२ कोटींची बिले दिली असून त्यापैकी ८८८२ कोटींचा भरणाही झाला आहे. महावितरणने पाच महिन्यांत एकूण २२ हजार ५९ कोटींची बिले पाठवली असून त्यापैकी १६ हजार ३२६ कोटींची वसुली झाली आहे. सर्वाधिक औद्योगिक ग्राहकांकडे १४९० आणि व्यावसायिक ग्राहकांकडे ७३१ कोटींची थकबाकी आहे.

व्यावसायिक आस्थापनांचे आस्ते कदमअनलॉकच्या टप्प्यात व्यावसायिक आस्थापनांना परवानगी दिली जात असली तरी त्यांचा वापर आजही पूर्ण क्षमतेने होत नाही. त्यामुळे तेथील विजेची मागणी ३४ टक्क्यांनी कमीच आहे. गेल्या पाच महिन्यांत या आस्थापनांना २ हजार ६७७ कोटींची बिले देण्यात आली असून त्यापैकी १९४६ कोटींची बिले या व्यावसायिकांनी भरली आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरण