शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ५,५०० सहकारी संस्थांची नोंदणी रद्द

By admin | Updated: February 25, 2016 04:09 IST

कोणतेही काम न करता केवळ कागदोपत्रीच नोंदणी असलेल्या राज्यातील ५१ हजार ७४ सहकारी संस्थांपैकी ५ हजार ५०१ संस्थांची नोंदणी सहकार खात्याने रद्द केली आहे. या दणक्यामुळे सहकारी

पुणे : कोणतेही काम न करता केवळ कागदोपत्रीच नोंदणी असलेल्या राज्यातील ५१ हजार ७४ सहकारी संस्थांपैकी ५ हजार ५०१ संस्थांची नोंदणी सहकार खात्याने रद्द केली आहे. या दणक्यामुळे सहकारी संस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. रद्द करण्यात आलेल्या संस्थांपैकी ११८ संस्था या पुणे जिल्ह्यातील आहेत.राज्यात सुमारे दोन लाख २८ हजार सहकारी संस्थांची नोंदणी सहकार खात्याकडे आहे. नोंदणी केल्यानंतर यातील अनेक संस्थांनी अनेक वर्षांपासून आपली कोणतीही स्थिती शासनाला कळवलेली नव्हती. त्यामुळे या संस्था अस्तित्वात आहेत का, त्यांची सद्य:स्थिती काय आहे, हे पाहण्यासाठी सहकार खात्याकडून जुलै ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत राज्यव्यापी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या सर्वेक्षणात ५१ हजार ७४ संस्था बंद, प्रत्यक्ष कार्य करीत नसल्याचे व नोंदणी केलेल्या जागेवर नसल्याचे आढळून आले होते. त्यामुळे या सर्व संस्थांना नोंदणी रद्द करण्यासाठीच्या नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या आणि कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. त्यात पहिल्या टप्प्यात ५ हजार ५०१ संस्थांची तपासणी सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यात या संस्थांची केवळ कागदोपत्रीच नोंद असल्याचे दिसून आले. या संस्था नोंदविण्यात आलेल्या असल्या, तरी त्यांचे कामकाज स्थगित आहे; तसेच काही संस्थांनी दिलेल्या पत्त्यावर संस्था अस्तित्वात नसल्याचेही आढळून आले. त्यामुळे संबंधित संस्थांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.रद्द झालेल्या संस्थांमध्ये सुमारे तीन हजार गृहनिर्माण संस्था आहेत. त्याचबरोबर नागरी ग्रामीण पतपुरवठा संस्था, नागरी बँका, नोकरदार पतपुरवठादार संस्था, कृषी प्रक्रिया सहकारी पतसंस्था आदींचाही यात समावेश आहे. रद्द करण्यात आलेल्या सहकारी संस्थांमध्ये पुणे जिल्ह्यातील ११८ संस्था आहेत. त्यांपैकी ११५ संस्था या ग्रामीण भागातील व ३ संस्था या पुणे शहरातील आहेत. २८ संस्था सोलापूर जिल्ह्यातील आहेत.