शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मिश्रशेतीतून ५० प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:09 IST

प्रगतिशील शेतकऱ्याचा उपक्रम

- अनिरु द्ध पाटील तलासरीच्या बोरीगाव येथील प्रगतिशील शेतकरी यज्ञेश सावे यांनी अडीच एकर क्षेत्रात मिश्रशेतीतून विविध पन्नास प्रकारचा भाजीपाला लागवड करून त्याची बाजारपेठेत विक्री करून नफ्याची शेती केली आहे. त्यांनी बाजारपेठेत मागणी आणि पुरवठ्याचे योग्य गणित जुळवून आणले आहे. त्यांच्या शेतीतील योगदानाबद्दल आतापर्यंत महाराष्ट्र शासन तसेच विविध संस्था आणि दै. ‘लोकमत’तर्फे ठाणे आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले असून त्यांच्या शेतीतील या व्यवस्थापन तंत्राविषयी जाणून घेऊया..मिश्रशेतीद्वारे पन्नासपेक्षा

अधिक पिकं घेण्याची संकल्पना कशी सुचली? ती प्रत्यक्षात कशी आली?

मी सध्या ५५ वर्षांचा असून चाळीस वर्षांपासून शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करतो. अनेक वर्षांपासून शेतीत वेलवर्गीय, भाजीपाला, फळभाजी, फुलशेती आणि बागायती असे उत्पादन घेतले जाते. मात्र हे वेगवेगळ्या हंगामात आणि कमी-अधिक प्रमाणात होते. उत्पादित मालाची विक्री महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील उंबरगाव या औद्योगिक वसाहतीलगतच्या बाजारपेठेत स्वत: करतो. मी सेंद्रिय शेती करीत असून दर्जेदार उत्पादन घेतो. ही माहिती कळल्यानंतर मागील काही वर्षांपासून माझ्या शेतमालाला ठराविक ग्राहकवर्ग निर्माण झाला आहे.

मिश्रपीक पद्धतीचा फायदा काय? शेतकºयांनी ही पद्धत अवलंबावी का?

मिश्र पद्धतीत विविध शेतमालाचे उत्पादन घेतले जाते. एका पिकाचे उत्पादन घटले तरी अन्य पिकामुळे ही घट भरून काढता येते. बाजारात काही शेतमालाच्या किमतीत घट झाली, तरी अन्य पिकामुळे एकूण उत्पादनातील नफा-तोट्याचे गणित साधता येते. शिवाय या पद्धतीमुळे किडरोगाचा प्रादुर्भावही कमी होतो. योग्य नियोजनातून चांगले उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे एकाच प्रकारचे उत्पादन घेण्यापेक्षा मिश्रशेतीला शेतकºयांनी प्राधान्य दिले पाहिजे.मागील तीन ते चार वर्षांपासून प्रायोगिक तत्त्वावर हे सुरू केले. त्यामुळे मागणीनुसार लागवडीचे नियोजन करताना अडीच एकरात पन्नासपेक्षा अधिक प्रकारचे शेती उत्पादन घेण्याचे ठरले.

उत्पादित मालाची मागणी आणि पुरवठ्यातील व्यवस्थापनाचे तंत्र कोणते?

मला शेतीची प्रचंड आवड असून तो माझा छंद असल्याने कामाचा थकवा कधी जाणवत नाही. त्यामुळे रोपाच्या नर्सरीपासून ते जमिनीची मशागत, मजूर आणि खत व पाण्याचे व्यवस्थापन स्वत: करतो. ठराविक ग्राहकवर्ग निर्माण झाल्याने उत्पादित माल त्यांना घरपोच पोहचविण्याची युक्ती लढवली. सोशल मीडियाच्या माध्यमातून मागणी आणि पुरवठ्याचे वेळापत्रक तयार करून प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यास फायदेशीर झाले आहे. त्याला ग्राहकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र