शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

कापसासाठी ‘५ एफ’ फॉर्म्यूला!

By admin | Updated: October 7, 2014 23:30 IST

घोटाळेबाज महाराष्ट्राला कुशल महाराष्ट्र बनविणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची खामगाव येथे ग्वाही.

खामगाव (बुलडाणा) : विदर्भ ही कापसाची भूमी असल्याचे सांगत, येथील कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ५ -एफ फॉम्र्यूला जाहीर केला. हा फॉम्र्यूला वापरून घोटाळ्यांनी बदनाम झालेल्या राज्याचे कुशल महाराष्ट्रात रूपांतर करण्याची ग्वाही त्यांनी खामगाव येथील जाहीर सभेत दिली.बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी आयोजित सभेत ते बोलत होते. कापूस उत्पादक शेतकर्‍यांचा आर्थिक विकास करायचा असेल, तर फार्म (शेती), फायबर (धागा), फॅब्रिक्स (कापड) , फॅशन (रेडीमेड गारमेंट) आणि फॉरेन (निर्यात) हा ५-एफ फॉर्म्यूला राबविणे आवश्यक आहे. जिथे कापूस उत्पादन होते तिथेच धागा बनावा, तिथेच कापड बनावे, त्या कापडापासून रेडीमेड कपडे तयार व्हावे आणि तयार झालेला माल इथूनच विदेशात जावा. या प्रक्रियेत शेतकर्‍यांपासून कारागिरापर्यंत, लहान-मोठय़ा व्यावसायिकांपासून तर व्यापार्‍यांपर्यंत सर्वांनाच उत्पादन मिळेल. भाजप स्पष्ट बहुमत घेऊन सत्तेत आले, तर हे स्वप्न निश्‍चित पूर्ण करू, अशी ग्वाही मोदी यांनी दिली. गत पंधरा वर्षे महाराष्ट्रात कुशासन होते. दरवर्षी नवीन घोटाळा उघडकीस आला. या घोटाळ्यांमुळे युवा पिढीचे भविष्य उध्वस्त झाले. भाजपच्या हाती सत्ता आली, तर युवकांना नव्या संधी देणारा स्कील्ड महाराष्ट्र उभा करु, असेही ते म्हणाले. रेल्वे, सिंचन, कृषी या प्रश्नांकडे केंद्र सरकारचे विशेष लक्ष आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात यासाठी खास तरतूद केली असून, प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. आजही महाराष्ट्रातील अनेक गावं भारनियमनामुळे १५ ते १८ तास अंधारात असतात, हे आश्‍चर्यच आहे; मात्र येणार्‍या काळात महाराष्ट्र भारनियमनमुक्त असेल. आघाडी सरकारने १५ वर्षे पाप केले. त्यामुळे १५ ऑक्टोबर रोजी या दोन्ही पक्षांना महाराष्ट्रातून हद्दपार करा, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले. यावेळी व्यासपीठावर आमदार भाऊसाहेब फुंडकर, खा.संजय धोत्रे, भाजपाचे उमदेवार डॉ. संजय कुटे, अँड. आकाश फुं डकर, योगेंद्र गोडे, सुरेशअप्पा खबुतरे, नरहरी गवई, चैनसुख संचेती, प्रकाश भारसाकळे, डॉ. गणेश मांटे, आ. गोवर्धन शर्मा, आ. डॉ. रणजित पाटील, हरिष पिंपळे आदी उपस्थित होते.** आघाडी, युतीचे राज्य संपवाआघाडी आणि युतीच्या कारभारात एकमेकांवर जबाबदार्‍या ढकलण्याचे प्रकार होतात. स्पष्ट बहुमताची सत्ता असली, तर त्या सरकारचा कान पकडता येतो, असे स्पष्ट करून, पाच वर्षानंतर मी माझ्या कामाचा लेखाजोखा जनतेपुढे मांडेन, असे आश्‍वासन मोदी यांनी दिले.