शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात ४८ % कापूस शेतक-यांकडून तणनाशकांचा वापर!

By admin | Updated: September 17, 2014 02:58 IST

कृषी विद्यापीठाचा निष्कर्ष:नुकसान टाळण्यासाठीचा पर्याय; मजूर टंचाईवरील नवा उपाय.

अकोला : कापसाचे नुकसान टाळण्यासाठी विदर्भातील ४८ टक्के कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी तणनाशकांचा वापर केला आहे. वाढते तण आणि मजुरांची टंचाई यावर उपाय म्हणून शेतकरी तणनाशकांचा वापर करीत असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत.कापसामध्ये पीक तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी पेरणीनंतरच्या २0 ते ६0 दिवसांचा आहे. या कालावधीत तणाचे नियंत्रण न केल्यास कापूस उत्पादनात लक्षणीय घट होते. राज्यातील कापसाच्या एकूण क्षेत्रापैकी अर्धेअधिक क्षेत्र विदर्भात आहे. खरीप हंगामात कापूस व इतर सर्व पिकांची पेरणी एकाचवेळी केली जाते. त्या तुलनेत मजूर मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्याप्रवण विदर्भातील सहा जिल्हय़ांतील शेतकरी त्रस्त आहेत. म्हणूनच कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी तणनाशकांचा वापर सुरू केला आहे; परंतु या शेतकर्‍यांपैकी किती टक्के शेतकरी तणनाशके वापरतात, कोणती व कशी वापरतात, याची अधिकृत व अचूक माहिती आतापर्यंत उपलब्ध नव्हती. यासाठी कापूस उत्पादक शेतकर्‍यांकडून तणनाशकांचा वापर या शास्त्रीय संशोधन प्रकल्पाचे सर्वेक्षण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी यावर्षी पूर्ण केले असून, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती व वर्धा या सहा जिल्ह्यांतील ४८ टक्के कापूस उत्पादक शेतकरी तणनाशकांचा वापर करीत असल्याचे निष्कर्ष काढले आहेत. या अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी अकोला जिल्ह्यातील बाळापूर, बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा, वाशिम जिल्ह्यांतील कारंजा लाड, अमरावती जिल्ह्यांतील अंजनगाव सुर्जी, यवतमाळ जिल्ह्यांतील नेर व वर्धा जिल्ह्यांतील देवळी या तालुक्यातील गावे व तेथील कापूस पिकाचा अभ्यास केला आहे.** अभ्यासाअंती केलेल्या शिफारशीराज्य शासनाच्या कृषी विभागाने पेरणीपूर्व तणनाशकाविषयी प्रशिक्षण, कार्यशाळा, प्रात्यक्षिके घ्यावीत. तणनाशकांच्या वापराविषयीची छापील सामुग्री तयार करण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांची मदत घ्यावी व त्या तंत्रज्ञानाचा शेतकर्‍यामंध्ये प्रचार व प्रसार करावा. त्यामुळे शेतकर्‍यांना तणनाशकाचे तांत्रिक ज्ञान मिळेल आणि प्रभावी तणनियत्रंण होण्यास मदत होईल, अशी शिफारस डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केली आहे. या प्रकल्पात डॉ. काळे यांच्यासह विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. डी.एम. मानकर , डॉ.पी.पी. वानखडे, डॉ.जे.पी. देशमुख यांनी काम पाहिले. सहा आत्महत्याप्रवण जिल्ह्यांत कापूस पिकासाठी वापरण्यात येणार्‍या तणनाशकांचा सूक्ष्म अभ्यास केला आहे. २00९-१0 मध्ये कापूस उत्पादक शेतकरी केवळ ३ टक्के तणनाशकांचा वापर करीत होते. ते प्रमाण आता ४८ टक्क्यांपर्यंंत पोहोचले आहे. यासाठी कृषी विद्यापीठाने अभ्यास करून राज्य शासनाकडे शिफारशी केल्या आहेत, असे कृषी विद्यापीठातील कापूस तणनाशक प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. एन.एम. काळे यांनी सांगितले.