शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

यवतमाळसाठी ४५० कोटींचे ‘पॉवर पॅकेज’

By admin | Published: May 03, 2015 12:48 AM

जिल्ह्यातील वीज वितरणाची समस्या दूर करण्यासाठी तब्बल ४५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये २५० कोटी रुपये पाच सब सेंटरसाठी

यवतमाळ : जिल्ह्यातील वीज वितरणाची समस्या दूर करण्यासाठी तब्बल ४५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये २५० कोटी रुपये पाच सब सेंटरसाठी, १०० कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चर वाढविण्यासाठी, ५५ कोटी कृषीच्या वीज जोडणीसाठी आणि ३३ कोटी फिडर सेप्रेशनसाठी खर्च करणार असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.यवतमाळ जिल्ह्याच्या मागासलेपणासाठी ऊर्जा खाते जबाबदार असल्याची कबुली देत ऊर्जामंत्री म्हणाले, येथे फिडर सेप्रेशनचे काम न झाल्यामुळे तब्बल २०० गावांना भारनियमन सोसावे लागत आहे. ज्या कंपन्यांनी अर्धवट काम सोडून पळ काढला, त्या आयव्हीआरसीएल आणि नागार्जुन यांना ब्लॅक लिस्टेड करण्यात आले आहे. जिल्ह्यात ट्रान्समिशन वाढविण्यासाठी २२० केव्हीचे सहा सब सेंटर प्रस्तावित आहेत. मारेगाव, बाभूळगाव, राळेगाव, मुकुटबन येथे प्रत्येकी १३२ केव्हीचे तर नेर, पांढरकवडा येथे २२० केव्हीचे सब सेंटर मंजूर करण्यात आले आहे. याशिवाय कृषीच्या वीज जोडणीसाठी ५५ कोटींची तरतूद केली असून धडक सिंचनच्या सहा हजार विहिरींना तसेच प्रलंबित असलेल्या ९९०० वीज जोडण्या निकाली काढण्यात येणार आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण केले जाणार आहे. ३१ मार्च २०१६ पर्यंत १०० कोटींचे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले जाणार आहे. आणखी येणाऱ्या १५०० वीज जोडणीसाठी ट्रान्समिशन मजबूत करण्याची गरज आहे. ३१ मार्च २०१६ पर्यंत जिल्ह्यातील वीजसमस्या निकाली काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. ३० डिसेंबर २०१६ नंतर शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीज कनेक्शनचा प्रस्ताव सादर करताच सात दिवसांच्या आत वीजजोडणी देण्यात येईल, अशीही ग्वाही त्यांनी दिली. वीजचोरी थांबविण्यासाठी सोशल इंजिनीअरिंंगचा प्रयोग राबविण्यात येणार आहे. ग्राहक सेवा मजबूत करण्यात येईल. आज एका जेईकडे पाच कर्मचारी असून अनेक फिडरचा प्रभार त्यांच्यावर आहे. त्यामुळे सर्वत्र बेबंदशाही निर्माण झाली आहे. बीई इलेक्ट्रिकल झालेल्या बेरोजगार अभियंत्यांना यापुढे आर्थिक वर्षात १५ लाखांची तीन कामे दिली जातील. पुढे हे बेरोजगार अभियंते दीड कोटीची कामे घेण्यासाठी पात्र होतील. स्थानिक पातळीवरचे अभियंते असल्याने कामातील उणिवा दूर होतील, असेही त्यांनी सांगितले.