शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

४० वर्षे जुना पूल कोसळला

By admin | Updated: September 6, 2016 04:17 IST

सिल्लोड-कन्नड राज्य महामार्ग क्र. ५१वरील मोढावाडीजवळच्या नाल्यावरील ४० वर्षे जुना पूल सोमवारी दुपारी कोसळला.

सिल्लोड (जि. औरंगाबाद) : महाड येथील पूल कोसळल्याची घटना ताजी असतानाच सिल्लोड-कन्नड राज्य महामार्ग क्र. ५१वरील मोढावाडीजवळच्या नाल्यावरील ४० वर्षे जुना पूल सोमवारी दुपारी कोसळला. पुलासह दोन मोटारसायकली २० फुट खोल नाल्यात कोसळल्या. यात चौघे जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.गोविंदा तुकाराम पंडित (४५) , बाळू आनंदा पंडित (२५), अजयसिंग तुकाराम राजपूत (२५) व आरती भारत बारवाल (२८) अशी जखमींची नावे असून गोविंदा व बाळू हे दोघे गंभीर जखमी आहेत. दुपारी चारच्या सुमारास मोटारसायकलवरून गोविंदा व बाळू हे सिल्लोडहून मोढाकडे येते होते, तर दुसऱ्या मोटारसायकलवरून अजयसिंग राजपूत व आरती बारवाल हे दोघे अन्वा येथे जात होते. दोन्ही मोटारसायकल पुलावर असतानाच अचानक हा पूल कोसळला.जवळपास ६० फूट लांबीच्या या पुलाचे भिंतीसदृश्य दोन खांब पाण्याच्या प्रवाहात कमकुवत झाले होते. त्यातील एक खांब सोमवारी कोसळली. यामुळे पुलाचे मधोमध दोन तुकडे झाले. त्यामुळे सिल्लोड, भराडी, कन्नड, चाळीसगाव, धुळे व आसपासच्या ५०पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला. पुलाच्या दोन्ही बाजुकडील वाहतूक दोन तास ठप्प होती. जेसीबीच्या सहाय्याने पर्यायी रस्ता तयार करून मोटारसायकलसह पायी जाणाऱ्यांची सोय करण्यात आली. तसेच जड वाहने मोढा मंगरुळमार्गे रवाना करण्यात आली. (प्रतिनिधी)>गणेशभक्तांची अडचणभराडी, बोरगावबाजार, मोढा, वांगी, कोटनांद्रा, घाटनांद्रा तसेच आसपासच्या गावातील गणेशभक्त मूर्ती खरेदीसाठी सिल्लोड येथे आले होते. परंतु घराकडे परत जाताना पूल कोसळल्याने ते सुमारे दोन तास अडकून पडले.>सिल्लोड -कन्नड राज्य महामार्ग क्र ५१ वरील मोढावाडीजवळील (जि. औरंगाबाद) नाल्यावरील ४० वर्ष जूना पूल सोमवारी (दि.५) दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक कोसळला . नेमके त्याच वेळेस पुलावरून जाणाऱ्या दोन मोटारसायकली पुलासह गडगडत खाली जाऊन मोटारसायकलस्वार चौघे जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.