शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरमध्ये दारूबंदीसाठी ३० महिलांचे मुंडण

By admin | Updated: August 16, 2014 02:15 IST

श्रमिक एल्गारतर्फे चार वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीसाठी आंदोलने करण्यात येत आहे.

वरोरा (जि़ चंद्रपूर) : श्रमिक एल्गारतर्फे चार वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीसाठी आंदोलने करण्यात येत आहे. शासनाला १३ आॅगस्ट ही शेवटची मुदत दिल्यानंतरही दारूबंदीची घोषणा करण्यात आली नसल्याने नुकतेच वरोरा शहरातील महात्मा गांधी चौकात श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष पारोमिता गोस्वामी यांच्यासह ३० महिलांनी मुंडण करून दारूबंदीसाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. श्रमिक एल्गारतर्फे दारूबंदीच्या मागणीसाठी विविध आंदोलने करण्यात येत आहेत. याची दखल घेत राज्य शासनाने दारूबंदीसंदर्भात चंद्रपूरचे पालकमंत्री संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने राज्य शासनाकडे दोन वर्षांपूर्वी अहवाल सादर केला. या अहवालावर आजतागायत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. लोकसभा निवडणूक प्रचार दौऱ्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले असता, श्रमिक एल्गारच्या पदाधिकारी व सदस्यांनी दारूबंदीबाबत छेडले असता, सध्या आचारसंहिता आहे. त्यानंतर निर्णय घेऊ, असे सांगितले होते. वारंवार पाठपुरावा करूनही चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात येत नसल्याने श्रमिक एल्गारच्या वतीने आॅगस्ट क्रांती अभियान सुरू करण्यात आले. १३ आॅगस्टपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली नाही, तर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय देवतळे यांच्या वरोरा येथील निवासस्थानासमोर १४ आॅगस्ट रोजी महिला मुंडण करतील, असा इशारा देण्यात आला होता. देवतळे यांच्या निवासस्थानासमोर मुंडण करण्याची परवानगी प्रशासनाने नाकारल्यानंतर वरोरा येथील महात्मा गांधी चौकात दुपारी १२ वाजता मुंडण आंदोलनाला सुरुवात झाली. (प्रतिनिधी)