शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

"या वर्षात एसटीच्या ताफ्यात दाखल होतील २६४० नव्या बस’’, प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 18:53 IST

ST Bus News: या वर्षभरात एसटीच्या ताफ्यात स्वमालकीच्या तब्बल २ हजार ६४० नव्या बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक रस्त्यावर नवी लालपरी धावताना दिसेल, असा विश्वास राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

ठाणे - या वर्षभरात एसटीच्या ताफ्यात स्वमालकीच्या तब्बल २ हजार ६४० नव्या बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक रस्त्यावर नवी लालपरी धावताना दिसेल, असा विश्वास राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन करताना त्यांनी ही माहिती दिली.

एसटीच्या  स्वमालकीच्या नवीन लालपरी बसेस ताफ्यामध्ये दाखल होत असून, आज १७ बसचे लोकार्पण मंत्री सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. याबाबत अधिक माहिती देताना प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत १५० लाल परी बसेस येणार असून, त्या ठाणे शहर आणि ठाणे ग्रामीण भागातील आगारांना देण्यात येतील. त्यानंतर दर महिन्याला ३०० एसटी बसेस दाखल होणार असून, राज्यभरातील सर्व आगारांना या बसेस मिळतील, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.

स्वच्छतेबरोबरच सुरक्षित प्रवासाला महत्त्व देत राज्यातील एकूणच परिवहन सेवेचा चित्र बदलण्याचा " मास्टर प्लॅन" आपण बनवीत असून,  टप्प्याटप्प्याने एसटीच्या आधुनिकीकरणाला सुरुवात होईल. त्याचा पहिला लाभ एसटी कर्मचाऱ्यांना झाला पाहिजे. त्यांच्या गणवेशापासून ते विश्रामगृह आणि स्वच्छतागृहापर्यंत त्यांना मिळणाऱ्या प्रत्येक सुविधांचा दर्जा उंचावला पाहिजे.  तरच आपण प्रवाशांना चांगल्या सुविधा देऊ शकतो, असे प्रताप सरनाईक म्हणाले.

एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी बोरिवली येथे शंभर खटांचा अद्यावत दवाखाना उभारण्यात येईल. इथे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या सर्व सुविधा एसटी कर्मचाऱ्यांना मिळतील अशी यंत्रणा निर्माण करण्यात येणार येईल. अशी घोषणा मंत्री सरनाईक यांनी यावेळी केली.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकstate transportएसटीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार