२४ तास विठ्ठल दर्शनाची मागणी

By Admin | Updated: June 9, 2015 02:43 IST2015-06-09T02:43:53+5:302015-06-09T02:43:53+5:30

कार्तिकी वारीप्रमाणे अधिक मासातसुद्धा मंदिर चोवीस तास खुले ठेवावे, अशी मागणी भाविकांनी मंदिर समितीकडे केली आहे.

24 hours Vitthal Darshan demand | २४ तास विठ्ठल दर्शनाची मागणी

२४ तास विठ्ठल दर्शनाची मागणी

पंढरपूर : अधिक मासामध्ये राज्यभरातून लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. त्यांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागते हा त्रास कमी करण्यासाठी मंदिर समितीने आषाढी, कार्तिकी वारीप्रमाणे अधिक मासातसुद्धा मंदिर चोवीस तास खुले ठेवावे, अशी मागणी भाविकांनी मंदिर समितीकडे केली आहे.
सोलापूर जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या ब्राह्मण विभागाच्या वतीनेही याबाबत मंदिर समितीला निवेदन दिले असून त्याची प्रत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आली आहे. माघी वारीपेक्षाही अधिक मासात विठ्ठलाचे पददर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी असते. त्यामुळे नित्योपचार करण्यात जास्त वेळ घालवू नये अशी मागणी आहे.

Web Title: 24 hours Vitthal Darshan demand