शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

२१४ कोळसा खाणपट्टे रद्द

By admin | Updated: September 25, 2014 05:13 IST

९९३ ते २०१० या काळात केंद्र सरकारने खासगी आणि सरकारी कंपन्यांना केलेले एकूण २१४ कोळसा खाणपट्ट्यांचे वाटप सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केले

२१४ कोळसा खाणपट्टे रद्दनवी दिल्ली : १९९३ ते २०१० या काळात केंद्र सरकारने खासगी आणि सरकारी कंपन्यांना केलेले एकूण २१४ कोळसा खाणपट्ट्यांचे वाटप सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केले. यापैकी ज्या ४० खाणपट्ट्यांमध्ये याआधीच उत्पादन सुरू झाले आहे त्यांना ते बंद करण्यासाठी सहा महिन्यांची म्हणजे ३१ मार्च २०१५ पर्यंतची मुदत दिली गेली आहे. रद्द केल्या गेलेल्या खाणपट्ट्यांमध्ये विदर्भातील २४ खाणपट्ट्यांचा समावेश असून, त्यापैकी १० खाणपट्ट्यांमध्ये उत्पादन सुरू झाले आहे.या काळात ‘स्क्रीनिंग कमिटी’च्या माध्यमातून व थेट सरकारकडून केले गेलेले एकूण २१८ कोळसा खाणपट्ट्यांचे वाटप ‘मनमानी आणि बेकायदा’ असल्याचा निकाल सरन्यायाधीश न्या. राजेंद्रमल लोढा, न्या. मदन लोकूर व न्या. कुरियन जोसेफ यांच्या खंडपीठाने २५ आॅगस्ट रोजी दिला होता. हे सर्व बेकायदा वाटप रद्द करावे. त्यामुळे होणारे परिणाम कितीही गंभीर असले तरी ते निस्तरण्याची आमची तयारी आहे, अशी ग्वाही केंद्र सरकारने दिल्यानंतर त्याच खंडपीठाने हा खाणपट्टे रद्द करण्याचा आदेश दिला. मात्र रिलायन्स समूहाच्या सासन पॉवर लि. कंपनीच्या अतिविशाल औष्णिक वीज प्रकल्पासाठी दिलेले मोहेर आणि मोहेर अमरोली एक्स्टेंशन हे दोन खाणपट्टे तसेच राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळास दिलेला पाकरी बाखाडिह व स्टील अ‍ॅथॉरिटी अआॅप इंडियास दिलेला तसरा या चार खाणपट्ट्यांचे वाटप इतरांप्रमाणेच बेकायदा असूनही न्यायालयाने ते रद्द केले नाही. रद्द केल्या गेलेल्या खाणपट्ट्यांपैकी ४० खाणपट्टे असे आहेत जेथे उत्पादन सुरु झाले आहे किंवा उत्पादन सुरु होण्याच्या बेतात आहे. त्या खाणी बंद करण्यासाठी न्याायलयाने संबंधित कंपन्यांना येत्या ३१ मार्च २०१५ पर्यंतची मुदत दिली आहे. दरम्यानच्या काळात या खाणी ताब्यात घेऊन कोल इंडियाने त्या चालव्यात, अशी अपेक्षा आहे.ज्यांना खाणपट्टयांचे वाटप झाले त्यांनी तेथे वेळेत उत्पादन सुरु न केल्याने सरकारचे प्रत्येक टन कोळशामागे २९५ रुपयांचे नुसकान झाले, असा अंदाज नियंत्रक व महालेखापरीक्षकांनी (कॅग) त्यांच्या अहवालात नोंदविला होता. त्यामुळे वाट झालेल्या खाणपट्ट्यांमध्ये ज्यांनी उत्पादन सुरु केले आहे त्यांनी आजवर काढलेल्या व ३१ मार्चपर्यंत काढल्या जाणाऱ्या कोळशावर अतिरिक्त लेव्हीपोटी प्रतिटन २९५ रुपये केंद्र सरकारला द्यावेत, असाही आदेश खंडपीठाने दिला. याची आत्तापर्यंतची थकबाकी ३१ डिसेंबरपर्यंत द्यायची आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)