चर्नी रोड येथील हिरे व्यापाऱ्याला २१ लाखांचा गंडा

By Admin | Updated: January 12, 2015 03:33 IST2015-01-12T03:33:13+5:302015-01-12T03:33:13+5:30

पॉलिश करण्यासाठी घेतलेले २१ लाखांचे हिरे लंपास केल्याची घटना चर्नी रोड येथे घडली. याबाबत हिरे व्यापाऱ्याने डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

21 lakhs of diamond merchants at Charni Road | चर्नी रोड येथील हिरे व्यापाऱ्याला २१ लाखांचा गंडा

चर्नी रोड येथील हिरे व्यापाऱ्याला २१ लाखांचा गंडा

मुंबई : पॉलिश करण्यासाठी घेतलेले २१ लाखांचे हिरे लंपास केल्याची घटना चर्नी रोड येथे घडली. याबाबत हिरे व्यापाऱ्याने डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
चर्नी रोड परिसरातील आॅपेरा हाऊस येथ विवेक शहा यांचा हिरे विक्रीचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी याच परिसरातील एका एजंटला २१ लाखांचे हिरे पॉलिश करण्यासाठी दिले होते, मात्र त्याने परस्पर या हिऱ्यांची विक्री केली. व्यापाऱ्याने त्याबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवी करीत असे. अखेर आपली फसवणूक झाल्याचे या व्यापाऱ्याच्या लक्षात येताच त्याने याबाबत डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 21 lakhs of diamond merchants at Charni Road