शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक दावा! सत्ताधारी २१ आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; एकाच ठेकेदारानं दिल्या आलिशान डिफेंडर कार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 16:47 IST

काँग्रेसने बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला असला तरी सर्वात आधी महायुतीतील भाजपाने गायकवाड यांच्याकडील डिफेंडर कारवरून आरोप केले होते.

मुंबई - राज्यात दिवाळीचा उत्साह आहे त्यातच राजकीय आरोपांचे फटाके फुटू लागले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीच आरोप प्रत्यारोपाने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच राज्यातील सत्ताधारी २१ आमदारांना जोरदार दिवाळी गिफ्ट मिळाल्याची चर्चा आहे. एकाच ठेकेदाराकडून २१ डिफेंडर कार सत्ताधारी आमदारांना देण्यात आल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. विशेष म्हणजे अलीकडेच बुलढाणा येथील शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या डिफेंडर कारवरून मित्रपक्ष असलेल्या भाजपानेच आरोप केला होता. 

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्रात गेल्या काळात ५० खोके एकदम ओक्के असा नारा गाजला होता, तसाच आणखी एक नारा येऊ पाहतोय. दिवाळीचे फटाके फुटत असताना महाराष्ट्रातील सत्ताधारी आमदारांना २१ डिफेंडर कार एका ठेकेदाराने गिफ्ट केल्या आहेत. आता हे २१ आमदार कोण आणि गिफ्ट देणारा तो ठेकेदार कोण हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. याचे उत्तर लवकरच महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही. २१ कार मिळाल्यात त्यातील एक बुलढाण्यातली आहे की ती २२ वी आहे हे पत्रकारांनी शोधावे असं त्यांनी म्हटलं.

काँग्रेसने बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला असला तरी सर्वात आधी महायुतीतील भाजपाने गायकवाड यांच्याकडील डिफेंडर कारवरून आरोप केले होते. त्यामुळे सध्या संजय गायकवाड यांची डिफेंडर कार चर्चेत आहे. या कारची किंमत जवळपास २ कोटी इतकी आहे. गायकवाड यांच्याकडील या आलिशान कारचा वाद विरोधकांनी नाही तर महायुतीतील नेत्याने उकरून काढला आहे. याच वादात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी २१ आमदारांना मिळालेल्या डिफेंडर कारच्या गिफ्टबाबत दावा केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

भाजपाने केला होता आरोप

बुलढाण्यात एक डिफेंडर कार दिसली, त्यावर आमदाराचे स्टीकर लावण्यात आले होते. ती कार एका कंत्राटदाराच्या नावावर आहे. कोणत्या कंत्राटातून कमिशन मिळाले याचा शोध पत्रकारांनी घेतला पाहिजे असा आरोप भाजपा नेते विजयराज शिंदे यांनी केला होता. भाजपाच्या या आरोपावर आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले होते. ती गाडी माझी नसून माझ्या नातेवाईकाची आहे. तो कंत्राटदार असला तरी आधी माझा नातेवाईक आहे. माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याच्याकडे आधी लिजेंडर होती ती विकून डिफेंडर कारवर दीड कोटीचं कर्ज घेतले आहे असं संजय गायकवाड यांनी म्हटलं. मात्र डिफेंडर कारच्या या वादावरून विरोधकांनी सत्ताधारी आमदारांवर नवा बॉम्ब टाकला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Controversial claim: 21 ruling MLAs gifted luxurious Defender cars?

Web Summary : Congress alleges 21 ruling Maharashtra MLAs received Defender cars as Diwali gifts from a contractor, sparking political controversy. This follows accusations against MLA Sanjay Gaikwad regarding his Defender, fueling further speculation and demands for transparency.
टॅग्स :Sanjay Gaikwadसंजय गायकवाडcongressकाँग्रेसHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळBJPभाजपा