शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंपाची २० लाख ५७ हजारांची रोकड लांबवली

By admin | Updated: June 2, 2014 22:55 IST

भारत पेट्रोलियम कंपनी संचालित पेट्रोल पंपावर जमा झालेली दोन दिवसांची २० लाख ५७ हजारांची रोकड बँकेत भरणा करण्यासाठी जात असताना लुटण्यात आली.

हायवेवर थरार : कर्मचार्‍याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून केले वारपुणे : भारत पेट्रोलियम कंपनी संचालित पेट्रोल पंपावर जमा झालेली दोन दिवसांची २० लाख ५७ हजारांची रोकड बँकेत भरणा करण्यासाठी जात असताना लुटण्यात आली. ही रक्कम घेऊन जात असलेल्या कर्मचार्‍याच्या डोळ्यांमध्ये मिरचीची पूड टाकून धारदार हत्यारांनी वार करण्यात आले. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास केवळडे फाट्याच्या पुढे ही घटना घडली.मौला शेख (वय २८, रा. केळवडे, ता. भोर) असे जखमी कर्मचार्‍याचे नाव आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख हे मूळचे उस्मानाबाद जिल्‘ातील रहिवासी असून काही वर्षांपासून ते केळवडे येथे राहत आहेत. भारत पेट्रोलियमच्या केळवडे फाट्यावरील पेट्रोल पंपावर ते नोकरी करतात. पेट्रोल पंपावर जमा झालेली दररोजची रक्कम बँकेत भरण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी देवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार आणि रविवार अशा दोन दिवस पेट्रोलपंपावर जमा झालेली २० लाख ५७ हजारांची रोकड घेऊन शेख कात्रज येथील स्टेट बँकेच्या शाखेत निघाले होते. खेड शिवापूर येथील कंपनीच्या आणखी एका पंपावरील रक्कम त्यांना घ्यावयाची होती. खेड शिवापूरच्या दिशेने मोटारसायकलवरून जात असतानाच मोटारसायकलवरून अचानक दोघेजण आले. त्यांनी शेख यांना धडक देऊन खाली पाडले. उठण्याचा प्रयत्न करीत असतानाच काही कळायच्या आतच त्यांनी शेख यांच्या डोळ्यांमध्ये मिरचीची पूड टाकली. कोयत्यासारख्या धारदार हत्यारांनी त्यांच्या हातावर, खांद्यावर आणि शरिरावर वार करायला सुरुवात केली. गंभीर जखमी झालेल्या शेख यांच्या खांद्याला असलेली पैशांची बॅग घेऊन चोरटे पुण्याच्या दिशेने पसार झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, अतिरिक्त अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, उपअधीक्षक मिलींद मोहिते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी देवकर, सहायक निरीक्षक संदीप घोरपडे, होडघर यांनी भेट दिली.  

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामीण भागात आणि महामार्गावर नाकाबंदी केली. तसेच सातारा आणि पुणे शहर पोलिसांनाही नाकाबंदीच्या सूचना दिल्या. पोलिसांना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून त्यावरून तपास सुरू करण्यात आला आहे. पुणे शहरालगतच्या सर्वच रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली असून सर्वत्र गस्त वाढविण्यात आल्याची माहिती देवकर यांनी दिली.