शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम खात्यातील १९ अधिकारी निलंबित

By admin | Updated: September 2, 2015 02:17 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वांद्रे व अंधेरी उपविभागात अधिकारी-कंत्राटदारांनी संगनमत करून कामांचे बनावट चाचणी अहवाल तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वांद्रे व अंधेरी उपविभागात अधिकारी-कंत्राटदारांनी संगनमत करून कामांचे बनावट चाचणी अहवाल तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १९ अधिकाऱ्यांना निलंबित केले असून, १८ कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले. बांधकाम विभागाच्या दोन उपविभागांमध्ये २०११ ते २०१४ या चार वर्षांत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या २९ कामांमध्ये वापरलेल्या साहित्याबाबतचे चाचणी अहवाल नियमानुसार विभागाच्या प्रयोगशाळेने द्यावयास हवे होते. त्याऐवजी बनावट अहवाल तयार करून बिले सादर करण्यात आली. पैसा उचलण्यात आला आणि शासनाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसल्याची बाब समोर आली आहे. महालेखापालांनी या साहित्य चाचणी अहवालांतील अनियमिततेवर बोट ठेवल्यानंतर विभागाच्या दक्षता व गुण नियंत्रण मंडळाने चौकशी करून शासनाला अहवाल सादर केला. त्यानुसार बांधकाम साहित्याचे चाचणी अहवाल विभगाच्या तुर्भे येथील प्रयोगशाळेने दिलेच नसल्याचे स्पष्ट झाले. खोटे अहवाल जोडण्यात आले. या अहवालाच्या आधारे अधिकाऱ्यांवर निलंबनाची तर कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची शिफारस विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी केली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. १९ अधिकारी, १८ कंत्राटदार तसेच दोन निवृत्त अधिकारी उपअभियंता ए.एस.बोरसे, उपअभियंता टी.जी.बंड यांची विभागीय चौकशी करून फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)काळ्या यादीत टाकण्यात आलेले कंत्राटदार१)सय्यद सिद्धिकी नासिर अली, २)किरण चंद्रकांत हाडवळे, ३)काझी मोहम्मद रेहाना. मजूर सहकारी संस्था अशा - ४) गीतांजली ५) प्रभात, ६)अभिनव,७) गिरनार ८) माता रमाई ९) श्री तिरुपती १०)श्री स्वामी विवेकानंद ११) दर्शना, १२) शिवसाई १३) नवोदय १४) मिलिंद १५) समीर १६)श्री गणेश कामगार १७) चारकोप गावकर, १८) चंद्रमणी.