शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

‘गोल्डन अवर’चे १,८०० कर्मचारी पगाराविना !

By admin | Updated: February 26, 2015 02:52 IST

अपघात झाला, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यावर त्यात जखमी झालेल्यांना ‘गोल्डन अवर’ (एक तासाच्या आत) उपचार मिळाल्यास

मुंबई : अपघात झाला, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यावर त्यात जखमी झालेल्यांना ‘गोल्डन अवर’ (एक तासाच्या आत) उपचार मिळाल्यास त्यांच्या जिवाचा धोका टाळता येऊ शकतो. जखमींना उपचार मिळण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका त्या ठिकाणी पोचण्याची गरज असते. यासाठीच महाराष्ट्र राज्य सरकारने १०८ हा टोल फ्री क्रमांक रुग्णवाहिकेसाठी दिला आहे. पण या रुग्णवाहिकांच्या १,८०० कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याचा पगार न मिळाल्याने त्यांनी मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते ८ या वेळेत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले होते. पण पगार मिळण्याचे आश्वासन मिळाल्यावर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. १ मार्च २०१४ रोजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते १०८ हा क्रमांक रुग्णवाहिकेसाठी सुरू करण्यात आला होता. १०८ हा क्रमांक डायल केल्यावर अवघ्या पाच ते पंधरा मिनिटांमध्ये रुग्णवाहिका त्या स्थळी पोहोचते. या रुग्णवाहिका सुसज्ज असतात. दिवस-रात्र ही सेवा सर्वांसाठी खुली आहे. सध्या महाराष्ट्रात एकूण ९०० रुग्णवाहिका कार्यरत आहेत. या रुग्णवाहिकांच्या चालकाला १२ तासांची पाळी असून, यांना महिना १२ हजार रुपये पगार देण्यात येतो. दर महिन्याच्या १० ते १५ तारखेपर्यंत कामगारांना पगार होतो. सध्या राज्यात ९०० रुग्णवाहिकांवर १ हजार ८०० चालक कार्यरत आहेत. ही सेवा दिवस-रात्र असल्याने १२ तास एका चालकाला काम करावे लागते. फेब्रुवारी महिन्याची २४ तारीख आली, तरी जानेवारी महिन्याचा पगार कामगारांना मिळाला नव्हता. यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी मंगळवारी सायंकाळी १ तास आंदोलन केले होते. बुधवारी पगार मिळण्याचे आश्वासन दिले होते. यामुळे आम्ही आंदोलनाला स्थगिती दिल्याचे कामगारांच्या संघटनेतर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)