शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील १३२ गावांत सौरदिवे मालवले !

By admin | Updated: June 20, 2015 00:18 IST

वनकायद्यामुळे नक्षलग्रस्त, दुर्गम व अतिदुर्गम भागात महावितरणला वीजपुरवठा करणे शक्य नव्हते. अशा ठिकाणी महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट

गडचिरोली : वनकायद्यामुळे नक्षलग्रस्त, दुर्गम व अतिदुर्गम भागात महावितरणला वीजपुरवठा करणे शक्य नव्हते. अशा ठिकाणी महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (मेडा)मार्फत जिल्ह्यात सौरऊर्जेच्या विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. २०११ ते २०१४ या कालावधीत हे काम करण्यात आले. मात्र या दिव्यांची योग्य ती देखभाल ठेवण्यात न आल्याने ते नादुरुस्तावस्थेत आहेत़ परिणामी १३२ गावांतील सौरदिवे मालवले आहेत़ जिल्ह्यात १६६८ महसुली गावे आहेत. यापैकी २६८ गावांत २०११ पर्यंत वीज पोहोचलेली नव्हती. ही बाब आर. आर. पाटील पालकमंत्री झाल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी पहिल्याच आढावा बैठकीत जानेवारी २०१० मध्ये याबाबत नाराजी नोंदविली व गावांना प्रकाशमान करण्याचा कार्यक्रम हाती घ्या, अशा सूचना केल्या. त्यानंतर महावितरणने १३६ गावांची विद्युतीकरणासाठी निवड केली. तर १३२ गावे त्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने या दुर्गम व अतिदुर्गम गावात सौरऊर्जेचा कार्यक्रम राबवून येथे विद्युतीकरण करण्याचे निश्चित करण्यात आले. या गावांची निवड करण्यासाठी मेडाने ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, पोलीस पाटील व विविध शासकीय यंत्रणेकडून सर्वेक्षण केले होते. त्यानंतर ही गावे निश्चित करण्यात आली. या गावातील कुटुंबांची संख्या निश्चित करून प्रत्येक घरात सौरऊर्जेची दोन साधने वितरित केली. यामध्ये ३७ वॅटची बॅटरी व दोन सीएफएल लाईट देण्यात आले होते. या १३२ गावांत सौरऊर्जेच्या विद्युतीकरणाचा कार्यक्रम मेडामार्फत पूर्ण झाला, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दरम्यान, राज्याच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने पर्यावरण समृद्ध ग्राम योजना, मागास क्षेत्र अनुदान विकास योजना आदी योजनांमधून गावात १० घरांमागे एक सौरऊर्जेचा पथदिवा देण्याची योजना सुरू केली. त्यामुळे मेडाने पथदिवे लावले नाही. मात्र, ज्या कुटुंबांना मागील तीन ते चार वर्षांत सौरऊर्जेची साधने वितरित करण्यात आली़ ती नादुरुस्त अवस्थेत आहेत. अनेक गावांत सौरऊर्जेच्या पथदिव्यांची बॅटरी व सौरऊर्जेची प्लेट चोरीला गेलेली आहे. त्यामुळे हे पथदिवे शोभेची वस्तू बनले आहेत़ एकूणच सौरऊर्जेच्या माध्यमातून विद्युतीकरणाचा प्रयत्न गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या गावांमध्ये फसला, असे चित्र आहे. (प्रतिनिधी)कुरखेडा तालुक्यात शासनाच्या विविध योजनांतून लावण्यात आलेले सौरऊर्जेचे पथदिवे बंद पडले आहेत. त्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यात आली नाही. केवळ दिवे लावून देण्यात आले. त्यामुळे आता अनेक गावांत अंधार आहे. याबाबत जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाकडे तक्रार देण्यात आली आहे.- चांगदेव फाये, पं. स. सदस्य, कुरखेडा