शहरं
Join us  
Trending Stories
1
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
2
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
3
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
4
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
5
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
6
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
7
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
8
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
9
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
10
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
11
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
12
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
19
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
20
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल १३१ तास स्केटिंग!

By admin | Updated: June 12, 2015 00:35 IST

एशिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद : ३ ते २९ वयोगटातील १४६ जणांचा सहभाग

कोल्हापूर : येथील अ‍ॅमॅच्युअर रोलर स्केटिंग अकॅडमी आणि शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे स्केटिंग प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या १३१ तासांचा रिले पद्धतीचा विक्रम १४६ स्केटर्सनी गुरुवारी सायंकाळी पाच वाजून ३१ मिनिटांनी पूर्ण केला. या विक्रमाची नोंद एशिया बुक आॅफ रेकॉर्डने घेतली. ताराबाई पार्क येथील बापूजी साळुंखे रोलर स्केटिंग रिंगवर झालेल्या विक्रमामध्ये कोल्हापूर, सांगली, पुणे, सातारा, रत्नागिरी, आदी ठिकाणांहून स्केटर्सनी सहभाग घेतला होता. १३१ तासांच्या उपक्रमाची सुरुवात शनिवारी (दि. ६)च्या सकाळी सहा वाजता करण्यात आली होती; तर हा विक्रम गुरुवारी (दि. ११) रोजी सायंकाळी ५ वाजून ३१ मिनिटे व ३१ सेकंदांनी नोंदविल्याचे एशिया बुक आॅफ रेकॉर्डचे प्रतिनिधी गौरव हंडुजा यांनी जाहीर केले. रिले पद्धतीने झालेल्या विक्रमात कृती शहा (वय ३), पृथ्वीराज शिंदे (४), मृदुला जोशी, खुशी संघवी (३), नीता बेळगावकर या एकोणतीस वर्षीय महिलेसह ओम जगताप या गतिमंद मुलानेही या उपक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी परमपूज्य काडसिद्धेश्वर महाराज, प्राचार्या शुभांगी गावडे, अ‍ॅड. धनंजय पठाडे, डॉ. संदीप पाटील, स्केटिंग प्रशिक्षक महेश कदम, धनश्री कदम, भास्कर कदम, कोल्हापूर अ‍ॅमॅच्युअर रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष अनिल कदम, आदी उपस्थित होते. बेळगावमधील शिवगंगा क्लबमध्ये नुकतेच सलग १२१ तास स्केटिंग करून विक्रम नोंदवला होता. आज कोल्हापुरातील स्केटिंगपटूंनी १३१ तास स्केटिंग करत हा विक्रम मोडला आहे.गेल्या सत्तावीस दिवसांमध्ये एशिया बुक आॅफ रेकॉर्डशी संबंधित २७ देशांमध्ये हा विक्रम कोणीही नोंदविलेला नाही.-गौरव हंडुजा, प्रतिनिधी,एशिया बुक आॅफ रेकॉर्डलक्षवेधी फलकस्केटिंग रिंगवर केंद्राच्या वतीने ‘खाऊ नको मावा, कॅन्सर होईल भावा,’ ‘अहिंसा टाळा, दहशतवाद टाळा,’ ‘स्त्री-भू्रणहत्या रोखा,’ ‘पाणी वाचवा, देश वाचवा’ अशा संदेशांचे फलक विविध ठिकाणी लावले होते. हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.