शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

भाजपला मोठा धक्का! खडसेंच्या पुढाकाराने १३ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 12:48 IST

भारतीय जनता पक्षातून (भाजप) राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आपला धडका कायम ठेवला आहे. उत्तर महाराष्ट्रात खडसेंचा जोर अद्याप ओसरलेला दिसत नाही. एकनाथ खडसेंमुळे भाजपच्या अडचणीत वाढतच जाताना दिसत आहेत. कारण भुसावळ नगरपालिकेतील नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

ठळक मुद्देएक गेला दुसरा येईल, पक्ष थांबणार नाही - भाजपभाजपला हद्दपार करायचं ठरवलंय - राष्ट्रवादी काँग्रेसएकनाथ खडसेंमुळे भाजपच्या अडचणीत वाढ

जळगाव : भारतीय जनता पक्षातून (भाजप) राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आपला धडका कायम ठेवला आहे. उत्तर महाराष्ट्रात खडसेंचा जोर अद्याप ओसरलेला दिसत नाही. एकनाथ खडसेंमुळे भाजपच्या अडचणीत वाढतच जाताना दिसत आहेत. कारण भुसावळ नगरपालिकेतील नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. (13 bjp corporator of bhusawal municipal council joins NCP in presence of eknath khadse)

उत्तर महाराष्ट्रात दबदबा असलेल्या एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत भाजप नगराध्यक्षासह १३ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपला हा मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे. 

भुसावळमध्ये अलीकडे घडलेल्या घडामोडींचा आढावा घेतल्यास भाजपच्या चिंता वाढताना दिसत असली, तरी राष्ट्रवादीसाठीही पक्ष नेतृत्त्वाच्या दृष्टीने पक्षांतर्गत आव्हाने निर्माण करणाऱ्या आहेत, असेही सांगितले जात आहे. नगरपालिका निवडणुकीपूर्वी झालेला हा पक्षप्रवेश भाजपसाठी कठीण जाणार आहे, असेही म्हटले जात आहे. 

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात विकासकामांची पोलखोल; मनसेच्या आरोपांना शिवसेनेचं प्रत्युत्तर

एक गेला दुसरा येईल, पक्ष थांबणार नाही

आमच्या काही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी पक्षांतर करताना पळवाट शोधली आहे. त्यांनी पक्षाला प्रत्यक्ष सोडचिठ्ठी दिलेली नाही. यामुळे पक्षाला निश्चितच फटका बसेल. पण तो फार काळ नसेल. कुणी पक्ष सोडून गेले म्हणजे पक्ष थांबत नसतो. एक गेला की दुसरा येतो. एकाचे काम थांबले की, दुसऱ्याला संधी मिळते. आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी आम्ही आतापासून मोर्चेबांधणी सुरुवात करणार आहोत. पक्षातील नव्या लोकांना संधी आणि जबाबदारी देऊ, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार संजय सावकारे यांनी दिली आहे. 

भाजपला हद्दपार करायचं ठरवलंय

आता लोकांनीच भाजपला हद्दपार करण्याचे ठरवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस परिसंवाद यात्रेच्या निमित्ताने त्याची प्रचिती आली. भुसावळ नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. पण गेल्या साडेचार वर्षांत शहराचा विकास तर सोडा मात्र, शहर अनेक वर्षे मागे पडले, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संतोष चौधरी यांनी केला. 

टॅग्स :Politicsराजकारणeknath khadseएकनाथ खडसेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगावBhusawalभुसावळ