शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

१०२ हेल्पलाइन गर्भवती महिलांसाठी वरदान

By admin | Updated: December 30, 2015 01:26 IST

राज्यातील ग्रामीण परिसरात, दुर्गम भागात, जेथे दळणवळणासाठी साधने सहज उपलब्ध नाहीत अशा ठिकाणच्या गर्भवती महिलांना प्रसूतीकळा सुरू झाल्यास रुग्णालयापर्यंत पोहोचणे अधिक

मुंबई : राज्यातील ग्रामीण परिसरात, दुर्गम भागात, जेथे दळणवळणासाठी साधने सहज उपलब्ध नाहीत अशा ठिकाणच्या गर्भवती महिलांना प्रसूतीकळा सुरू झाल्यास रुग्णालयापर्यंत पोहोचणे अधिक जिकिरीचे होते. या महिलांसाठी १०२ हा टोल फ्री क्रमांक सध्या वरदान ठरत आहे. गेल्या वर्षात या क्रमांकामुळे ४१ हजार ३०५ गर्भवती महिलांना रुग्णालयांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. १०२ हा क्रमांक लावल्यास तत्काळ जवळपासच्या परिसरातील रुग्णवाहिका त्या पत्त्यावर पाठवण्यात येते. ही रुग्णवाहिका सुसज्ज असते. कोणतेही शुल्क न घेता गर्भवती महिलांना रुग्णालयापर्यंत पोहोचवणे, डिस्चार्ज मिळाल्यास बाळ आणि आईला घरी पोहोचवणे ही सुविधा देण्यात येते; तर २ वर्षापर्यंतच्या बाळांना रुग्णालयात नेण्याची वेळ आल्यास मोफत सेवा दिली जात असल्याचे या सेवेशी संबंधित असलेले विवेक शेळके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मोफत रुग्णवाहिका सेवागर्भवती महिला आणि नवजात बालकांचे आरोग्य चांगले राहावे आणि माता, बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी १०२ क्रमांकावर मोफत रुग्णावाहिका सेवा उपलब्ध आहे.दोन हजारांवर रुग्णवाहिका ३४ जिल्ह्यांमध्ये १०२ या टोल फ्री क्रमांकासाठी २ हजार ४८८ रुग्णवाहिका आहेत. या रुग्णवाहिका तालुका, जिल्हा पातळीवरील आरोग्य केंद्रे, रुग्णालये, दवाखाने येथे उपलब्ध असतात. जानेवारी २०१५ ते २८ डिसेंबर २०१५ कालावधीतील कॉल्स एकूण कॉल : २६,५४,८५२प्रतिसाद दिलेले : १५,१४,१०० योग्य कॉल्स : ४१,३०५अनावश्यक कॉल्स : १४,६२,५७६वेटिंग, मिस्ड कॉल्स : ११,४०,७५२