शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

५० हजाराच्या उत्पन्नावर १० हजाराची पोटगी वैध

By admin | Updated: November 19, 2014 00:52 IST

पतीचे मासिक उत्पन्न ५० हजार रुपये असल्यास विभक्त झालेल्या पत्नीला १० हजार रुपये पोटगी देण्यात काहीच चुकीचे नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

हायकोर्टाचा निर्णय : कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायमराकेश घानोडे - नागपूरपतीचे मासिक उत्पन्न ५० हजार रुपये असल्यास विभक्त झालेल्या पत्नीला १० हजार रुपये पोटगी देण्यात काहीच चुकीचे नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.याप्रकरणातील दाम्पत्य नागपूर येथील रहिवासी आहे. पती छत्तीसगडमध्ये नोकरीला असून पत्नी नागपुरात भाड्याने राहते. त्यांना अपत्य नाही. १० जुलै २००८ रोजी त्यांचे लग्न झाले होते. आपसात पटत नसल्यामुळे ते विभक्त झाले. विभक्त होण्यासाठी दोघेही एकमेकांना कारणीभूत ठरवीत आहेत. पत्नीकडून क्रूर वागणूक मिळत असल्याचा आरोप करून पतीने घटस्फोटासाठी दावा दाखल केला होता. कौटुंबिक न्यायालयाने त्यांचा दावा खारीज केला होता. पत्नीने पोटगीसाठी दावा केला होता. त्यावर कौटुंबिक न्यायालयाने पत्नीला १० हजार रुपये मासिक पोटगी व खटल्याचा पाच हजार रुपये खर्च देण्याचा आदेश दिला. या आदेशाविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात पुनर्विचार अर्ज दाखल केला होता. आपली मासिक कमाई केवळ तीन हजार रुपये असल्याचे पतीने तोंडीच सांगितले. त्यावर पत्नीने पतीचे आयकर कागदपत्रे सादर केलीत. त्यातून पतीचे मासिक उत्पन्न ५० हजार रुपयांपेक्षा कमी नसल्याचे स्पष्ट झाले. ही बाब लक्षात घेता पत्नी १० हजार रुपये पोटगीसाठी पात्र असल्याचा निष्कर्ष उच्च न्यायालयाने नोंदवून पतीचा अर्ज फेटाळून लावला.