शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतील आॅनलाईन स्पर्धेचे आमिष दाखवून १० लाखांचा गंडा

By admin | Updated: September 18, 2014 00:42 IST

अमेरिकेकडून ‘हिटलर युथ बॅन्ड अवॉर्ड’ ही आॅनलाईन स्पर्धा घेण्यात येत असून विजेत्याला १०० कोटींचे बक्षिस मिळणार असल्याची बतावणी करुन दोन भामट्यांनी एका उच्चशिक्षित कुटुंंबाला लाखो रुपयांनी गंडविले.

अमरावती : अमेरिकेकडून ‘हिटलर युथ बॅन्ड अवॉर्ड’ ही आॅनलाईन स्पर्धा घेण्यात येत असून विजेत्याला १०० कोटींचे बक्षिस मिळणार असल्याची बतावणी करुन दोन भामट्यांनी एका उच्चशिक्षित कुटुंंबाला लाखो रुपयांनी गंडविले. मंगळवारी रात्री ८.४५ वाजता ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. करण मुन्नालाल चौरागडे (२०, रा. मोतीनगर) व शुभम राजेश अग्रवाल (२०,रा. कल्याण नगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. करण चौरागडे हा शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात तृतीय वर्षाला शिकतो. त्याची ओळख कॅम्प परिसरातील गणेडीवाल ले-आऊट येथील रहिवासी विलास अजबसिंग ठाकूर यांच्याशी होती. ठाकूर यांना दोन मुली आहेत. यातील एक मुलगी ‘स्कॉलर’आहे. याचा फायदा घेण्याची योजना करणने आखली. अमेरिकेकडून आॅनलाईन पध्दतीने ‘हिटलर युथ बॅन्ड अवॉर्ड’ स्पर्धा घेण्यात येत असल्याची बतावणी केली. या स्पर्धेत यशस्वी झाल्यास ५०० कोटींच्या बक्षिसांचे वाटप होणार असल्याचे त्याने ठाकूर यांना सांगितले. भारतातील व्यक्ती स्पर्धेचा मानकरी ठरल्यास त्याला १०० कोटींचे बक्षीस मिळणार असल्याचेही ठाकूर यांना पटवून देत त्याने त्यांच्या मुलीला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. मुलीने परीक्षा देण्याची तयारी दर्शविल्यानंतर पालकही तयार झाले. लगेच मुलीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला. परीक्षेसाठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम व हिटलरची बायोग्राफी उपलब्ध करुन देण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून करणने ठाकूर यांच्याकडून गेल्या पाच महिन्यांपासून जवळपास १० लाख ७० हजार ६३० रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याची बाब निदर्शनास येताच ठाकूर यांनी याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी करण चौरागडे व शुभम अग्रवाल यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. याप्रकरणात शुभमचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिली. (प्रतिनिधी)