शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीसह १0 विमानतळ मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 05:24 IST

विमानतळांच्या विकासासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणाशी आज राज्य सरकारचा करार झाला.

मुंबई : शिर्डीसह राज्यातील दहा विमानतळांचा प्रश्न मार्गी लागला असून विमानतळांच्या विकासासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणाशी आज राज्य सरकारचा करार झाला. या मध्ये शिर्डी, अमरावती, गोंदिया, नाशिक, जळगाव, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील विमानतळांचा समावेश आहे. शिर्डी विमानतळावरून येत्या नोव्हेंबरपासून वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न असेल, तर राजगुरुनगर येथे विमानतळासाठी येत्या सप्टेंबरमध्ये पाहणी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या करारावेळी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव आर.एन.चौबे, मुख्य सचिव स्वाधीन क्षित्रय, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे चेअरमन डॉ. गुरूप्रसाद महापात्रा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी.के. जैन, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्यामलाल गोयल, एमएमआरडीए आयुक्त युपीएस मदान आदी उपस्थित होते. या विमानतळांसाठी राज्य शासन देणार असलेल्या सवलतींची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. शिर्डी विमानतळ येथून नोव्हेंबरपासून वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले. केंद्र सरकार व भारतीय विमानतळ प्राधिकरण राज्य सरकारला सर्व सहकार्य करेल, असे अशोक गजपती राजू यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)>चाकण आंतरराष्ट्रीय विमानतळराजगुरुनगर (नवीन चाकण) येथे विमानतळासाठी येत्या सप्टेंबरमध्ये पाहणी करण्यात येणार आहे. राजगुरु नगरच्या (खेड) पूर्व भागात भारत फोर्ज कंपनीच्या ‘सेझ‘जवळील जागेत विमानतळ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाची (एमएडीए) या जागेला तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर विमानतळ होईल. सुमारे दोन हजार एकर जागेत हा प्रकल्प प्रस्तावित आहे लोहगाव येथील लष्कराचा तळ या विमानतळाच्या पट्ट्यात येत असल्याने लष्कराच्या हरकतीमुळे चाकण विमानतळाचा प्रस्ताव २००७ मध्ये बारगळला. त्यानंतर तो शिरोली-चांदूस येथील जागेची निवड करण्यात आली. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध केला. त्यामुळे या विमानतळासाठी कोये-कुरकुंडी येथील जागा सूचविण्यात आली. मात्र, ती जागाही नाकारून आता राजगुरूनगरच्या जागेची पाहाणी होणार आहे. जागा निवडीतच या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाची गेली चौदा वर्षे फरफट सुरू आहे.>सरकार या सवलती देणारइंधनावरील मूल्यवर्धित त कराचा दर १० वर्षांसाठी एक टक्का इतका करण्यात येईल.विमानतळांच्या पुनरूज्जीवनासाठी आवश्यक तेवढी जमीन विनामूल्य देणार.विमानतळांना रस्ते, रेल्वे, मेट्रो, जलवाहतुकीचे मार्ग आदींनी जोडण्यात येईल.या विमानतळांना पोलीस आणि अग्रिशमन सेवा नि:शुल्क पुरविली जाईल.राज्य शासनाकडून या विमानतळांना वीज, पाणी आदी सुविधांसाठी भरीव सवलत देणार