म्हाडाच्या घरांसाठी १ लाख २७ हजार ३५८ अर्ज!

By Admin | Updated: May 15, 2015 02:31 IST2015-05-15T02:31:37+5:302015-05-15T02:31:37+5:30

म्हाडाच्या १ हजार ६६ घरांसाठी गुरुवारी रात्री ७ वाजेपर्यंत १ लाख २७ हजार ३५८ अर्ज दाखल असून, त्यापैकी ५९ हजार ७८९ अर्जदारांनी

1 lakh 27 thousand 358 applications for MHADA houses! | म्हाडाच्या घरांसाठी १ लाख २७ हजार ३५८ अर्ज!

म्हाडाच्या घरांसाठी १ लाख २७ हजार ३५८ अर्ज!

मुंबई : म्हाडाच्या १ हजार ६६ घरांसाठी गुरुवारी रात्री ७ वाजेपर्यंत १ लाख २७ हजार ३५८ अर्ज दाखल असून, त्यापैकी ५९ हजार ७८९ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केल्याची माहिती म्हाडाच्या वतीने प्रसारमाध्यमांना देण्यात आली.
म्हाडाच्या घरांकरिता आॅनलाइन अर्जासाठी नोंदणी करण्याची १४ मे अंतिम तारीख होती. आता आॅनलाइन नोंदणी केलेल्या अर्जदारांना १८ मेपर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येणार आहेत. जे अर्जदार अनामत रक्कम आॅनलाइन भरणार असतील त्यांना ती १८ मेपर्यंत बँकेत जमा करावी लागेल. तर २० मेपर्यंत डीडीद्वारे अनामत रक्कम अ‍ॅक्सिस बँकेत भरता येणार आहे.
१४ मेपर्यंतच नोंदणी करता येणार असल्याने सायंकाळी ४.३० ते ६ वाजेपर्यंत म्हाडा लॉटरीसाठीच्या संकेतस्थळावर अर्जदारांच्या उड्या पडल्या होत्या. एकाचवेळी संकेतस्थळाचे वापरकर्ते वाढल्याने सायंकाळी लॉटरीचे संकेतस्थळ कोलमडले होते.

Web Title: 1 lakh 27 thousand 358 applications for MHADA houses!