शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

रील्स बनवताना अचानक तडफडू लागला, मित्रांना वाटलं अॅक्टिंग करतोय, काही क्षणांतच गेला जीव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 18:52 IST

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमधील मुरैना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील अंबाह येथे रील्स बनवण्याच्या नादात एका सातवीतील मुलाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

मध्य प्रदेशमधील मुरैना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील अंबाह येथे रील्स बनवण्याच्या नादात एका सातवीतील मुलाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. रील्स बनवण्यासाठी हा मुलगा गळफास घेतल्यांचा अभिनय करत होता, मात्र त्याचा खरोखरच फास लागून मृत्यू झाला. या घटनेचा लाईव्ह व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये हा तरुण मित्रांसोबत मिळून फासावर लटकण्याचा अभिनय करत होता. तर त्याचे मित्र मोबाईलवर त्याचं शूटिंग करत होते. तेवढ्यात या मुलाचा पाय घसरला आणि फास लागून त्याचा जीव गेला.  

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार स्वत:च्या घरासमोरील रिकाम्या असलेल्या जागेत करण परमार हा सातवीत शिकत असलेला विद्यार्थी मित्रांसोबत खेळत होता. करणला अचानक रील्स बनवण्याची लहर आली. त्याने मित्रांना मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग करण्यास सांगितलं. त्यानंतर एका झाडाला फास लावून तो गळफास लावल्याचा अभिनय करू लागला. मात्र तेवढ्यात त्याचा पाय निसटून दुर्घटना घडली.  

व्हिडीओ बनवत असलेल्या त्याच्या मित्रांना तो कदाचित अभिनय करतोय, असं वाटलं. मात्र याचदरम्यान, त्याचा श्वास गुदमरला आणि तो तडफडू लागला. तेव्हा मित्रांनाही काहीतरी गडबड झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी त्याचा गळफास सोडवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना तो फास सोडवता आला नाही.  बघता बघता करण बेशुद्ध पडला. 

करणची ती अवस्था पाहून त्याचे मित्र घाबरले. काहीच हालचाल होत नसल्याचे लक्षात आल्यावर ते करणला तिथेच सोडून पळून गेले. व्हिडीओ बनवत असलेला मुलगाही तिथून पळाला. घटनेची माहिती मिळताच करणचे कुटुंबीय तिथे पोहोचले. त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांना  देण्यात आली. आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.  

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाMadhya Pradeshमध्य प्रदेश