बेडरूमसाठी बेडशीट खरेदी करताय?; या गोष्टी लक्षात घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 06:25 PM2019-04-02T18:25:07+5:302019-04-02T18:25:17+5:30

दिवसभराच्या थकव्यानंतर घराची ओढ प्रचंड जाणवते. घरी जाऊन कधी एकदा आराम करतोय असं होतं. एकदा का घरी गेलं आणि बेडवरती जाऊन पडलं की दिवसभराचा सगळा थकवा निघून जातो.

These tips to consider before buying bed sheets | बेडरूमसाठी बेडशीट खरेदी करताय?; या गोष्टी लक्षात घ्या

बेडरूमसाठी बेडशीट खरेदी करताय?; या गोष्टी लक्षात घ्या

Next

दिवसभराच्या थकव्यानंतर घराची ओढ प्रचंड जाणवते. घरी जाऊन कधी एकदा आराम करतोय असं होतं. एकदा का घरी गेलं आणि बेडवरती जाऊन पडलं की दिवसभराचा सगळा थकवा निघून जातो. अशातच बेड आणि बेडवरती असलेलं बेडशीट जर व्यवस्थित असेल तर आणखी आरामदायी वाटतं. आपण एकदा बेडवर बेडशीट वापरलं तर ते आपण लगेच धुण्यासाठी काढत नाही. काही दिवस ते तसचं असतं. त्यामुळे बेडशीट खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. जाणून घेऊया बेडशीट खरेदी करताना लक्षात घेण्याच्या काही टिप्स...

1. अनेकदा आपण बेडशीट घेतना ते दिसायला कसं दिसतं याकडे लक्ष देतो आणि त्यानंतरच खरेदी करतो. चांगलं दिसणारं बेडशीट चांगलं असेलच असं नाही. खासकरून एक गोष्ट लक्षात घ्या की, बेडशीट खरेदी करताना वातावरणाचाही अंदाज घ्या. 

2. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये बेडशीट घेण्याचा विचार करत असाल तर कॉटनचं बेडशीट उत्तम ठरतं. तेच थंडीमघ्ये सिल्क, लेनिनच्या बेडशीटचा वापर करा. 

3. बेडशीट खरेदी करताना साइजकडे लक्ष द्या. खासकरून कॉटनचं बेडशीट घेताना याकडे लक्षं द्या. कारण कॉटनचं बेडशीट धुतल्यानंतर आकसतं. कॉटनमध्येही वेगवेगळ्या वरायटीचे बेडशीट्स असतात. 

4. ज्या बेडशीट्सचा दररोज वापर करण्यात येतो, त्यांच्यावर रिकल पडतात. त्यामुळे दररोज वापरण्यात येणारे बेडशीट्स विकत घेताना ते रिकल फ्री असतील आणि ते धुण्यासाठी सोपे असतील याची काळजी घ्या. 

5. बेडशीटचा रंग आणि लूक बेडरूमला सुंदर बनवतं. त्यामुळे बेडरूमचा कलर लक्षात घेऊन बेडशीट निवडा. बेडशीट बेडरूमला मॅचिंग झाल्याने बेडरूमची शोभा आणखी वाढते.
 
6. बेडशीट कोणच्या बेडरूमसाठी खरेदी करत आहात यावरून तुम्ही त्याची फ्रिंट डिसाइड करू शकता. म्हणजे, जर तुम्ही मुलांच्या बेडरूमसाठी खरेदी करत असाल तर अ‍ॅनिमल फ्रिंट तसेच मोठ्यांच्या बेडरूमसाठी बेडशीट घेत असाल तर फ्लोरल फ्रिंट असलेले बेडशीट्स खरेदी करू शकता. 

Web Title: These tips to consider before buying bed sheets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.