शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

हवेहवेसे वाटणारे स्मार्ट होम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 00:09 IST

घर घेताना शाळा, कॉलेज, मार्केट, रेल्वे स्थानक इतकेच नव्हे, तर चांगले रुग्णालय परिसरात असावे, असा विचार सर्वसामान्यांकडून केला जातो.

- पद्मजा जांगडेघर घेताना शाळा, कॉलेज, मार्केट, रेल्वे स्थानक इतकेच नव्हे, तर चांगले रुग्णालय परिसरात असावे, असा विचार सर्वसामान्यांकडून केला जातो. मात्र, हल्ली पती-पत्नी दोघेही नोकरी करणारे असल्याने आणि दिवसातील १० ते १२ तास घराबाहेर राहत असल्याने त्यांच्या घराबाबतच्या संकल्पना थोड्या बदलल्या आहेत. घर अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त, सुरक्षित आणि मोबाइल रेंजमध्ये असण्याला प्राधान्य दिले जात आहे. थोडक्यात काय, घर डेकोरेटिव्ह करण्याबरोबरच स्मार्ट, डिजिटलाइज्ड असण्यावर भर दिला जात आहे, त्यामुळे आता बिल्डर्सचाही लक्झरी सोसायट्या बनविण्याकडे कल वाढला आहे.ल क्झरी सोसायट्यांमध्ये एकवेळ घराचा एरिया थोडा लहान असेल. मात्र, क्लब हाउस, स्विमिंग पूल, जीम, गार्डन आदी सुविधांबरोबरच आता सीसीटीव्ही, इंटरकॉम सेवा, आॅटो लिफ्ट, सेंटर डोअर, फायर अलार्म, स्मार्ट लॉक या अत्याधुनिक सुविधाही दिल्या जात आहेत. त्यासाठी खास अ‍ॅप तयार करण्यात येत आहेत.रहिवासी संकुलांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने प्रवेश केल्याने त्या परिसरात इंटरनेट सेवाही उत्तम असणे गरजेचे आहे. शिवाय रहिवाशांबरोबरच या सेवाही सुरक्षित राहणे आवश्यक आहेत. कारण केबल तुटणे, शॉर्टसर्किट, सिस्टम ब्लॉक होण्याचे प्रकार कधीही, कुठेही होऊ शकतात. त्यामुळे कन्स्ट्रक्शन कंपन्यांकडून इंटरनेट स्पीड आणि सुरक्षेवर विशेष भर दिला जात आहे. मध्यंतरी एका प्रख्यात कन्स्ट्रक्शन कंपनीने गॅसगळती, फायर अलार्मसाठी रहिवाशांना सेंसर, स्वतंत्र डिव्हाइस उपलब्ध करून दिले आहे. तंत्रज्ञानाचे जसे फायदे, तसे तोटेही असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. मुंबईतील एका गृहसंकुलात सुरक्षेसाठी पासवर्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी बायोमॅट्रिक किंवा फेसरीडर नसल्याने रहिवाशांसाठी ते अडचणीचे ठरू लागले. कारण पासवर्ड मिळवून कोणीही आत प्रवेश करू शकतो, अशी भीती त्यांचा वाटू लागली आहे. त्यामुळे दर आठवड्याला पासवर्ड बदलण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. अनेक संकुलांमध्ये लाइट्स, एसी, फॅनसाठी एक अ‍ॅप, म्युझिक सिस्टम, होम थिएटरसाठी दुसरे, सुरक्षेसाठी तिसरे, गॅस गळती/फायर अलार्मसाठी चौथे असे वेगवेगळे अ‍ॅप्स तयार करण्यात येत आहेत, यामुळे अत्याधुनिक सुविधा मिळत असल्या तरी अनेकदा रहिवाशांचा गोंधळही उडालेला दिसतो. राहणीमान उंचावण्यात टेक्नोलॉजीचा मोठा वाटा आहे. स्मार्ट सुविधांचा संबंध लक्झरी जीवनमानाशी जोडला जात असला तरी शेवटी सिस्टममध्ये कधीही बिघाड होऊ शकतो, याचा अनुभव वरळीतील एका महिलेला काही दिवसांपूर्वी आला. संकुलातील व्हिडीओ कॅमेरा अचानक हॅँग झाला, सिस्टम क्रॅश झाल्याने सेंसर बेल आणि स्मार्ट लॉकही काम करेनासे झाल्याने त्यांना तब्बल चार तास घराबाहेर राहावे लागते. शेवटी टेक्निशिअन आल्यावर हा बिघाड दुरुस्त झाला.>स्मार्ट होमची संकल्पना भुरळ घालणारी असली तरी आपल्याकडे ती आता कुठे रुजू लागली आहे. मोठमोठ्या, उच्चभ्रू गृहसंकुलांमध्ये कन्स्ट्रक्शन कंपन्यांकडून या सुविधा पुरवल्या जातात. तर काही संकुलांमध्ये त्यासाठी एजंट नेमले जातात. इव्हेेंट मॅनेजमेंटप्रमाणे सोसासटी मॅनेजमेंटसाठीही आॅटोमोशन आणि संबंधित कंपन्यांना काँट्रॅक्ट दिले जातात आणि संकुलातील, घरातील सिस्टम कसे मेंटेन ठेवावे, अ‍ॅप्स कसे हाताळावे, याचे ट्रेनिंगही कंपन्यांकडून दिले जाते, त्यामुळे भविष्यात अशा स्मार्ट होमची मागणी वाढणार हे नक्की.