शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

लातूर जिल्ह्यात पाण्याचा ठणठणाट; टंचाईग्रस्त गावांचा आकडा चारशेपार!

By हरी मोकाशे | Updated: May 17, 2024 17:01 IST

लातूर जिल्ह्यातील २९० गावांची तहान ३५९ अधिग्रहणांवर

लातूर : रखरखत्या उन्हामुळे जलसाठ्यात आणि भूजल पातळी खालावली आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे चटके आणखीन तीव्र होत आहेत. सध्या जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या चारशेपार झाली आहे. अधिग्रहणासाठी ६६७ प्रस्ताव दाखल आहेत. त्यापैकी २९० गावांना ३५९ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढेही पर्जन्यमान झाले नाही. परिणामी, जिल्ह्यातील काही गावांना हिवाळ्यापासून पाणीटंचाई जाणवू लागली. प्रकल्पांमध्ये अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाली नाही. यंदा सर्वाधिक कडक उन्हाळा जाणवत असल्याने जलसाठ्यातील पाणी पातळी आणि भूजल पातळी खालावली आहे. जिल्ह्यातील भूजल पातळी जवळपास दीड मीटरने घटली आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा आणखीन तीव्र झाल्या आहेत. घागरभर पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. टँकर आले की पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची चढाओढ होत आहे.

शिरुर अनंतपाळात एकही अधिग्रहण नाही...जिल्ह्यात सर्वाधिक अधिग्रहणे अहमदपूर तालुक्यात आहेत. ६४ गावांना ६४ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. लातूर- ५६, औसा - ५७, निलंगा- ५०, रेणापूर- ५८, चाकूर- २३, उदगीर- २९, देवणी- ६, जळकोट तालुक्यात १६ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ तालुक्यात अद्यापह एकही अधिग्रहण करण्यात आले नाही. सध्या जिल्ह्यातील २९० गावांना ३५९ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

टँकरसाठी ५७ गावांचे प्रस्ताव...गावात पिण्यासाठीही पाणी मिळत नसल्याने जिल्ह्यातील ३७ गावे आणि २० वाड्या अशा एकूण ५७ गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केला आहे. त्यापैकी २२ गावे आणि ५ वाड्या अशा एकूण २७ गावांना २६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

औसा तालुक्यात भीषण पाणीटंचाई...औसा तालुक्यात सर्वात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे तेथील १० गावांनी टँकरची मागणी केली आहे. त्यापैकी लामजना, खरोसा, माेगरगा, टाका, तांबरवाडी/ राजेवाडी, कार्ला, शिवणी लखवाडी, रामेगाव, मासुर्डी या गावांना टँकर मंजूर करण्यात आले आहेत. अहमदपूर तालुक्यातील टेंभूर्णी, ब्रह्मवाडी, हसर्णी, जळकोट तालुक्यातील शिवाजीनगर तांडा/ वाघमारी तांडा, येलदरा, लातूर तालुक्यातील बोरगाव, साखरा, चिंचोली ब., चिखुर्डा, गुंफावाडी, रामेगाव, रुई, दिंडेगाव, रेणापुरातील सेलू खु., उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी, महादेववाडी या गावांना टँकरने पाणीपुरवठ्यास मंजुरी देण्यात आली आहे.

अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई...लातूर - ४८औसा - ४६निलंगा - ६८रेणापूर - ४८अहमदपूर - ९९चाकूर - ३३शिरुर अनं. - १२उदगीर - ४०देवणी - २०जळकोट - २०एकूण - ४३४

टॅग्स :laturलातूरwater scarcityपाणी टंचाई