चेऱ्यातील शेतकऱ्यांचे रस्त्यासाठी लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:14 AM2021-06-18T04:14:59+5:302021-06-18T04:14:59+5:30

चेरा येथील गट क्र. ११३, ११४, ११५, ११६ आणि १५७ मधील शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला. परंतु, ...

Typical hunger strike for cherry farmers | चेऱ्यातील शेतकऱ्यांचे रस्त्यासाठी लाक्षणिक उपोषण

चेऱ्यातील शेतकऱ्यांचे रस्त्यासाठी लाक्षणिक उपोषण

Next

चेरा येथील गट क्र. ११३, ११४, ११५, ११६ आणि १५७ मधील शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला. परंतु, एका शेतकऱ्याने हा रस्ता अडविला आहे. परिणामी, रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. दरम्यान, सदरील धमकी देत आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अर्धवट रस्ता कामामुळे इतर शेतकऱ्यांना शेतीकडे ये-जा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. यासंदर्भात प्रशासनाने कार्यवाही करण्याची मागणी मार्चपासून करण्यात येत आहे. परंतु, अद्यापपर्यंत त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

त्यामुळे या शेतकऱ्यांनी गुरुवारी रस्त्यासाठी लाक्षणिक उपोषण केले. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावर संजय मरेवाड, पांडुरंग माने, शेषेराव कुलकर्णी, नागोराव माने, लक्ष्मण चेरेकर आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

सदरील रस्त्याचा प्रश्न हा गंभीर असून शेतीकडे जाणारा रस्ता कोणीही अडवू शकत नाही. प्रशासन चार दिवसांत जाय मोक्यावर जाऊन पाहणी करून रस्ता खुला करेल, असे आश्वासन तहसीलदार संदीप कुलकर्णी यांनी दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले.

Web Title: Typical hunger strike for cherry farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.