वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना

By राजकुमार जोंधळे | Updated: April 26, 2025 01:43 IST2025-04-26T01:40:21+5:302025-04-26T01:43:52+5:30

शुक्रवारी रात्री १०.४५ वाजताचा अपघात...

tempo overturns, one killed, 25 injured; incident in Ahmedpur taluka | वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना

वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना

किनगाव (जि. लातूर) : विवाह सोहळ्याचा कार्यक्रम आटोपून पाथरीकडे (जि. परभणी) निघालेला टेम्पो धानोरा पाटीनजीक पुलाच्या कठड्याला धडकल्याने शुक्रवारी रात्री १०.४५ वाजता उलटला. यामध्ये १ ठार, २५ वऱ्हाडी जखमी झाले आहेत.

धानोरा बु. (ता. अहमदपूर) येथील मेहताब शेख यांच्या मुलाचा विवाह गुरुवारी झाला. पाथरी येथील वधूकडील ४० ते ५० वऱ्हाडी मंडळी धानोरा येथे वलिमासाठी शुक्रवारी टेम्पोतून (एमएच २० ईजी ७७०९) पाथरीकडे रात्री निघाले होते. दरम्यान, पुलाच्या कठड्याला टेम्पो धडकल्याने तो उलटला. यामध्ये दोघे ठार झाले असून, २५ वऱ्हाडी जखमी झाले आहेत. यात महिलांचाही समावेश आहे.

हे आहेत अपघातातील जखमी...
अपघातात अल्तमाश शेख हा ठार झाला असून, जखमींमध्ये हुसेन शेख, राबियाबी शेख, मुजमिल शेख, शेख नबी शेख शेरखां, साहिल शेख, निजाम शेख, साहिद शेख, लतिफाबी पठाण, शेख नबी शेख रहिम, अफरिन सय्यद यांच्यासह २५ वऱ्हाडी मंडळींचा समावेश आहे. असे किनगाव ठाण्याच्या पाेलिसांनी सांगितले.

स्थानिक नागरिकांनी घेतली धाव -
अपघात घडल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, डीवायएसपी आदिनाथ सिरसाठ, सपोनि. भाऊसाहेब खंदारे यांनी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल केले. मयतांची नावे मात्र रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाहीत.

Web Title: tempo overturns, one killed, 25 injured; incident in Ahmedpur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.