महाकाल प्रतिष्ठानच्या वतीने पापविनाश मंदिरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST2021-09-08T04:25:05+5:302021-09-08T04:25:05+5:30

लातूर : येथील महाकाल प्रतिष्ठान व भस्म रमैया भक्त मंडळाच्या वतीने पापविनाश मंदिरातील प्राचीन श्री भूतेश्वर ...

In the temple of annihilation on behalf of Mahakal Pratishthan | महाकाल प्रतिष्ठानच्या वतीने पापविनाश मंदिरात

महाकाल प्रतिष्ठानच्या वतीने पापविनाश मंदिरात

लातूर : येथील महाकाल प्रतिष्ठान व भस्म रमैया भक्त मंडळाच्या वतीने पापविनाश मंदिरातील प्राचीन श्री भूतेश्वर महादेव मंदिरात माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते महारुद्र यज्ञ व महाआरती करण्यात आली. महाकाल प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षीही श्रावण महिन्याच्या शेवटच्या रविवारी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या हस्ते पापविनाश श्री भूतेश्वर महादेव मंदिरात महारुद्र यज्ञ व महाआरतीचा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय व श्रध्दापूर्वक वातावरणात पार पडला. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून साजरा करण्यात आला. महायज्ञ व महाआरतीनंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश पदाधिकारी प्रेरणा होनराव, नगरसेवक शैलेश स्वामी, व्यंकट वाघमारे, महाकाल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वैभव डोंगरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Web Title: In the temple of annihilation on behalf of Mahakal Pratishthan