शिक्षकांसाठी विशेष वेबिनार मालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:14 IST2021-06-11T04:14:26+5:302021-06-11T04:14:26+5:30

दुचाकीच्या अपघातात एकजण जखमी लातूर : शहरातील एक नंबर चौकात भरधाव वेगात निष्काळजीपणे (एमएच २४, ३८८९) क्रमांकाची दुचाकी चालविल्याने ...

Special webinar series for teachers | शिक्षकांसाठी विशेष वेबिनार मालिका

शिक्षकांसाठी विशेष वेबिनार मालिका

दुचाकीच्या अपघातात एकजण जखमी

लातूर : शहरातील एक नंबर चौकात भरधाव वेगात निष्काळजीपणे (एमएच २४, ३८८९) क्रमांकाची दुचाकी चालविल्याने अपघात झाला. दुचाकी भरधाव वेगात चालविल्याने अपघात होऊन त्यात एकजण जखमी झाला. याबाबत दीपक श्रीरंग भडंगे (रा. क्वाईल नगर, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीस्वाराविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल देशमुख करत आहेत.

दुचाकीची धडक; एकजण जखमी

लातूर : शहरातील पाच नंबर चौकात भरधाव वेगातील (एमएच २४ एएल ९११५) क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने निष्काळजीपणे धडक दिली. यात फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगटाजवळ जखम झाली असून, दुखापत केली आहे. याबाबत सचिन शिवमूर्ती सुरवसे (रा. वरवंटी, जि. लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Special webinar series for teachers