संतोष बालगीर यांचा लातुरात सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:24 IST2021-07-07T04:24:48+5:302021-07-07T04:24:48+5:30

संताेष बालगीर यांनी देशातील १३ राज्यातील वेगळेपण सायकलवर प्रवास करत पाहिले प्रवासादरम्यान त्यांनी कारगिल येथील सैनिकांना मानवंदना दिली़ ...

Santosh Balgir felicitated in Latur | संतोष बालगीर यांचा लातुरात सत्कार

संतोष बालगीर यांचा लातुरात सत्कार

संताेष बालगीर यांनी देशातील १३ राज्यातील वेगळेपण सायकलवर प्रवास करत पाहिले प्रवासादरम्यान त्यांनी कारगिल येथील सैनिकांना मानवंदना दिली़ तर परतीच्या प्रवासात रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला ही अभिवादन केले़ अध्यक्षीय समाराेप प्रा़ शिवराज माेटेगावरक यांनी केला़ ते म्हणाले, संताेष हा माझा विद्यार्थी असल्याचा अभिमान आहे़ संताेष याने भविष्यात माेठे यश मिळविण्यासाठी अशीच मेहनत करावी़ यश मिळाल्याने हुरळून जाता कामा नये, असेही मत त्यांनी व्यक्त केले़ यावेळी तुकाराम पाटील, सच्चिदानंद ढगे, मकरंद जाधव, शशिकांत पाटील, सुंदर पाटील कव्हेकर,ॲड दासराव शिरुरे,प्राचार्य अविनाश सातपुते, असिफ शेख,राजू वानरे,गणेश जाधव, कल्पना फरकांडे, विष्णू चव्हाण, मदन भगत, सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती़ सूत्रसंचालन पद्माकर वाघमारे यांनी तर आभर डी़ एस़ पाटील यांनी मानले़

Web Title: Santosh Balgir felicitated in Latur