शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ३३ डाएट संस्थांमधील कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:20 IST

प्रत्येक जिल्ह्यात प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षणाच्या प्रगतीसाठी १९९५-९६ साली ३३ ठिकाणी राज्यात जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात ...

प्रत्येक जिल्ह्यात प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षणाच्या प्रगतीसाठी १९९५-९६ साली ३३ ठिकाणी राज्यात जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या. त्यानंतर डाएटचे काम अत्यंत उत्तमरीत्या सुरू होते. मात्र, कोरोनाच्या संकटकाळात शाळा बंद झाल्या. तरीही विद्यार्थ्यांचे अध्यापन बंद होऊ नये यासाठी डाएटने विविध माध्यमांतून शिक्षण चालू ठेवण्यासाठी प्रयत्न केले. शाळा बंद, शिक्षण चालू, स्वाध्याय मालिका आदी उपक्रम राबविण्यात आले. मात्र, या संस्थेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वेतनाविना आर्थिक अडचण सहन करण्याची वेळ आली आहे. मार्च २०२० पासून डाएटमधील प्राचार्य, अधिव्याख्याते यांचे वेतन अनियमित व विलंबाने होत आहे. यामुळे बँकांचे हप्ते, पाल्यांच्या शाळांचे शुल्क, आजारपण, त्यावरील खर्च अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे डाएटच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यातच कोरोना काळातही आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात कर्तव्य बजवावे लागत आहे. शासनाकडे पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतली जात नाही. गेल्या पाच महिन्यांपासून आमचे वेतन झालेले नाही. विशेष म्हणजे या संस्थेत प्रतिनियुक्तीवर असलेल्यांचे नियमित वेतन होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा आणि नियमित वेतन करावे, अशी मागणी होत आहे.

पाच महिन्यांपासून होतेय काटकसर

गेल्या पाच महिन्यांपासून शासनाने वेतन दिलेले नाही. त्यामुळे अनेकांचे बँकांचे हप्ते थकीत आहेत. शिवाय, घर खर्च भागवितानाही मोठी काटकसर करावी लागत आहे. कोरोनाच्या संकटकाळात दवाखाना, मुलांचे शिक्षण याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. राज्य शासनाने तत्काळ वेतन द्यावे, अशी मागणी प्राचार्य अनिल मुरकुटे यांनी केली.