शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘ई-पाॅस’ मशीनवर अंगठा न देताच ग्राहकांना मिळणार रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:14 IST

लातूर : कोरोनाच्या संकटामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात रेशन कार्डधारकांना मोफत धान्य देण्याचे जाहीर करण्यात आले ...

लातूर : कोरोनाच्या संकटामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात रेशन कार्डधारकांना मोफत धान्य देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार नियोजनही पूर्ण झाले आहे. मात्र ई-पाॅस मशीनवर कार्डधारकाला अंगठा देऊनच धान्य घ्यावे लागणार होते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असल्याने ही अट रद्द करण्याची मागणी दुकानदारांकडून करण्यात आली होती. त्यानुसार रेशन कार्डधारकांना अंगठा न देताच मे महिन्यात मोफत धान्य मिळणार आहे.

जिल्ह्यात ४ लाख ४ हजार ३७३ रेशन कार्डधारक आहेत. यामध्ये एपीएल ६० हजार १९२, प्राधान्य कुटुंब लाभार्थी ३ लाख २ हजार ७६६, तर अंत्योदयचे ४१ हजार ४१५ लाभार्थी आहेत. सर्व कार्डनुसार १८ लाख ६१ हजार ७८४ सदस्यांची संख्या आहे. संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात मोफत धान्य देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार पुरवठा विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले. रेशन कार्डधारकांना धान्य घेताना ई-पाॅस मशीनवर अंगठा देणे बंधनकारक आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता या बाबीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका अधिक असल्याचे रेशन दुकानदार संघटनेच्या वतीने शासनाच्या निदर्शनास आणून दिले.

मोफत धान्यामुळे अनेकांना आधार

जिल्ह्यात ४ लाख ४ हजार ३७३ कार्डधारक आहेत. कोरोनाच्या या संकटकाळात आधार मिळावा, यासाठी धान्य वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने गहू, तांदळाचे आवंटन मंजूर करण्यात आले होते.

प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात रेशन माल पोहोचला आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करीत वितरण सुरू झाले आहे. संचारबंदीमुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात मोफत धान्य मिळत असल्याने अनेकांची गैरसोय दूर होण्यास मदत झाली आहे. शासनाच्या या निर्णयाचे अनेकांनी समाधान व्यक्त केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रेशन दुकानांवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.

प्रत्येक रेशन कार्डधारकाला मास्क वापराबाबत सूचना करण्यात येत आहेत. तसेच फिजिकल डिस्टन्स आणि सॅनिटायझरचा वापर होत आहे.

पुरवठा विभागाच्या नियमानुसार रेशन दुकानावर धान्य वितरण होत आहे.