लग्नाचे आमिष दाखवून चुलतीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:18 IST2021-04-12T04:18:04+5:302021-04-12T04:18:04+5:30

याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नागोराव जाधव म्हणाले, अहमदपूर तालुक्यातील वरवंटी येथील एका बेरोजगार युवकाचे त्याच्या चुलतीसोबत सन ...

Rape of cousin by showing the lure of marriage | लग्नाचे आमिष दाखवून चुलतीवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून चुलतीवर बलात्कार

याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नागोराव जाधव म्हणाले, अहमदपूर तालुक्यातील वरवंटी येथील एका बेरोजगार युवकाचे त्याच्या चुलतीसोबत सन २०१५ मध्ये प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर, सदर युवक २०१७ मध्ये पोलीस भरती झाला, तेव्हापासून तो धुळे येथे कार्यरत आहे. दरम्यान, त्याने विवाहाचे आमिष दाखवून संबंध ठेवले. त्यानंतर, त्याने विवाह केला नाही. या प्रकरणी सदरील पीडित महिलेने धुळे शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्यानुसार, ६ एप्रिल रोजी आरोपी पोलिसाविरुद्ध कलम ३७६, २ (एन), ४०६, ४१७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपासासाठी हे प्रकरण अहमदपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागोराव जाधव करीत आहेत.

Web Title: Rape of cousin by showing the lure of marriage