शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा संकुलात साकारली आर्टिफिशिअल वूड डिझाइनची ओपन जीम - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:11 IST

लातूर - शरीर तंदुरुस्तीसाठी प्रत्येक व्यक्ती व्यायामाचा आधार घेत असते. व्यायामामुळे शरीराला बळकटी मिळते. यासह मनही प्रसन्न राहते. त्यामुळे ...

लातूर - शरीर तंदुरुस्तीसाठी प्रत्येक व्यक्ती व्यायामाचा आधार घेत असते. व्यायामामुळे शरीराला बळकटी मिळते. यासह मनही प्रसन्न राहते. त्यामुळे व्यायामासाठी लातूरच्या क्रीडा संकुलात नेहमीच गर्दी दिसते. आता संकुल समितीने नव्याने आर्टिफिशिअल वूड डिझाइनची ओपन जीम साकारली आहे. त्यामुळे लातूरकरांच्या व्यायामाला बळकटी मिळाली आहे.

लातूरचे क्रीडा संकुल सकाळ-सायंकाळच्या सत्रात खेळ व व्यायामासाठी नेहमीच गजबजलेले दिसते. संकुलाच्या पूर्वेस असलेल्या ओपन जीमवर नागरिक व युवकांची नेहमीच गर्दी असते. त्यामुळे जिल्हा संकुल समितीने पूर्वेच्या ओपन जीमशेजारी अद्ययावत अशी दहा प्रकारच्या साहित्याची ओपन जीम नव्याने साकारली आहे. संकुल समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री अमित देशमुख यांच्या निर्देशानुसार ही ओपन जीम नुकतीच संकुलात बसविण्यात आली आहे. यात लेगप्रेस, चेस्टप्रेस, शोल्डर बिल्डर, डिप्स स्टँड, सिटिंग ॲण्ड स्टँडिंग ट्विस्टर, सिटअप बेंच, मल्टीफंक्शनल ट्रेनर, एअर वॉकर, रोवर, एक्झरसायकल आदी प्रकारचे साहित्य आहे. जवळपास ७ लाख रुपये किमतीचे हे साहित्य या नव्या ओपन जीममध्ये बसविण्यात आले आहे. सकाळ, सायंकाळच्या सत्रात या ठिकाणी हजारो लोक ओपन जीमचा व्यायामासाठी वापर करत असत. त्यामुळे संकुलात नव्याने आर्टिफिशिअल वूड डिझायनचे हे ओपन जीम साहित्य बसविण्यात आले आहे. यामुळे लातूरकरांच्या व्यायामाला चालना मिळणार आहे.

तापमानाच्या परिणामावर लागणार अंकुश...

अद्ययावत मशीन आर्टिफिशअल वूड डिझायनची असल्याने उन्हाळ्यात जास्त प्रमाणात गरम होत नाही, तर थंडीत जास्त प्रमाणात थंड होत नाही. पूर्वी ओपन जीमसाठी लोखंडी साहित्य असल्याने ते उन्हाळ्यात अधिक तापायचे तर थंडीत अधिक थंड व्हायचे. मात्र, या नव्या डिझाइनमुळे साहित्यावर तापमानाचा परिणाम होणार नाही.

नागरिकांच्या सोयीसाठी उचलले पाऊल...

सकाळ, सायंकाळच्या सत्रात हजारो नागरिक व युवक संकुलातील ओपन जीमवर शारीरिक कसरती करतात. त्यामुळे या ठिकाणी गर्दी व्हायची. नागरिकांच्या व्यायामाच्या सुलभतेसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी सांगितले.