शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण प्रकरणात रियांशच्या जबाबानंतरच लागणार आरोपींचा सुगावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 15:04 IST

सांगवी येथील घराच्या अंगणात खेळणाऱ्या रियांश नीळकंठ सावंत या पाच वर्षीय मुलाचे एका कारमधून अपहरण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली होती.

ठळक मुद्दे२४ तासांनंतर रियांशची सुटका झाली होतीपोलिसांना वाहनाचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहे.

लातूर : रेणापूर तालुक्यातील सांगवी येथील पाच वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या आरोपींचा सुगावा मुलगा आणि कुटुंबियांच्या जबाबानंतरच लागणार आहे. पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे, तर लोखंडी सावरगाव येथील एका पेट्रोलपंपावर आरोपी कारमध्ये इंधन भरतानाचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहे. गुन्ह्यातील वाहन जप्त करण्यात आलेल्या माहितीला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.

सांगवी येथील घराच्या अंगणात खेळणाऱ्या रियांश नीळकंठ सावंत या पाच वर्षीय मुलाचे एका कारमधून अपहरण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली होती. शनिवारी रात्री  पोलीस पथकांचा ससेमिरा मागे लागल्याने आरोपींनी रियांशला चाटा गावानजीकच्या रस्त्यावर सोडून पोबारा केला होता. पोलिसांनी रियांशला ताब्यात घेतले. अखेर २४ तासांनंतर रियांशची सुटका झाल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला. शनिवारी रात्री उशिरा रियांशला त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. 

दुसऱ्या दिवशीही आरोपी मोकाटचएकूण बारा पोलीस पथके आरोपींच्या मागावर होते. अखेर २४ तासांनंतर रियांश चाटा गावात सापडला. मात्र, दुसऱ्या दिवशीही  आरोपी मोकाटच होते. याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव म्हणाले, आरोपींचा शोध पथके घेत आहेत, लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील. रियांशचा जबाब यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अपहरणाच्या काही तासांनंतर स्थानिक गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस पथकांनी रस्त्यालगत  हॉटेल, धाब्यावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. अखेर लोखंडी सावरगाव  (जि. बीड) येथील पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही फुटेज हाती लागले.  इंधन भरतानाचे फुटेज, रियांशचा जबाब आणि कारमुळे आरोपीपर्यंत पोहोचता येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :KidnappingअपहरणlaturलातूरPoliceपोलिस